दिवाळी गोड! मोदी सरकारकडून महाराष्ट्राला 1 हजार 566 कोटींचा निधी|VIDEO

Maharashtra Gets Major Boost: केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला एसडीआरएफअंतर्गत १,५६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2025-26 साठी एसडीआरएफच्या केंद्रीय वाट्याचा दूसरा हप्ता म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक सरकारांना 1950.80 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे.

एकूण रकमेपैकी कर्नाटकसाठी 384.40 कोटी रुपये आणि महाराष्ट्रासाठी 1566.40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यामुळे या वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्यांना तत्काळ मदत मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्र सरकार पूर भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे असे या पत्रात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com