मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आलेली आहे. भाजपकडे सर्वाधिक जागा आहत, तर शिंदेंच्या शिवसेनेकडे मोजक्याच जागा आहेत. पण शिंदेंच्या शिवसेनेशिवाय भाजपला सत्ता स्थापन करता येत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठ्या पदासाठी दावा ठोकला जातोय. पण भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला थारा दिला जात आहे. भाजपने मुंबई महापालिकेच्या महत्त्वाच्या ३ पदांवर दावा केला असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीतील अंतर्गत चर्चांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिकेत महापौर पदासोबतच उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष पदावरही भाजप दावा करणार करणार असल्याचे समजतेय. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये शिंदेसेनेला महापौर पद सोडल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महत्त्वाची पदे भाजपकडेच राहावीत अशी भूमिका नेत्यांनी घेतली आहे. मुंबईत सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून आल्याने तिन्ही पदांवर पक्षाचा डोळा आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत लवकरच चर्चा करून अंतिम निर्णय होईल, असे समजतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.