उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनंतर आता मुंबईतील नगरसेवकही फुटणार असल्याचे संकेत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानंतर ते स्वतंत्र गट स्थापन करून शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याचे सांगितले जाते. यावरून महाराष्ट्रात जोरदार राजकीय राडा सुरू आहे. मात्र, यापुढील काही दिवसांत आमदार फुटणार असल्याचेही सत्ताधारी महायुतीचे अनेक नेते सांगत आहेत. आता तर यापेक्षाही मोठा धक्का उद्धव ठाकरेंना बसू शकतो, अशीही चर्चा एकीकडे सुरू आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत संकेत दिले आहेत.
तुम्ही आमच्यासोबत होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी चालत होतात. पण काँग्रेसच्या सोबत गेलात. औटघटकेचं मुख्यमंत्रिपद मिळालं. पण तुम्ही व्होट बँक गमावलीत. तुमचे नेते सकाळपासून बडबड करतात. लोक वैतागले आहेत. खासदार, आमदारही वैतागले. काही दिवसांनी मुंबईतील नगरसेवकही 'जय महाराष्ट्र' करतील, अशी शक्यता महाजन यांनी बोलून दाखवली.
तुमच्या पक्षात लोक राहायला तयार नाहीत. त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडलं. पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात जाणार असल्याचं वारं नुसतं सुटलं तरी तुम्ही ज्यांना जायचं आहे त्यांनी खुशाल जावं म्हणता. मग लोक निघून गेले. खासदारांच्या बाबतीतही असंच झालं. तुमच्या पक्षात लोकांना थांबायचेही नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. राऊत यांच्यामुळेच ठाकरे सेना फुटली, असा आरोपही त्यांनी केला. महानगरपालिका, नगरपालिका तुमच्या हातून गेल्या. आता भविष्यात आणखी वाईट परिस्थिती तुमची होणार आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.