Bhagwan Gad : भगवान गड संतोष देशमुख कुटुंबीयांच्या पाठिशी - नामदेव शास्त्री महाराज | VIDEO

Namdev Shastri Maharaj : भगवानगडावर भेटीदरम्यान देशमुख कुटुंबीयांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व पुरावे नामदेव शास्त्रींच्या समोर सादर केले. त्यानंतर शास्त्री महाराज यांनी देशमुख कुटुंबाला पाठिंबा देण्याबाबत विधान केले.

Bhagwan Gad Namdev Shastri : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. काही दिवसांपूर्वी धनजंय मुंडे यांनी भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली होती. आज (२ फेब्रुवारी) संतोष देशमुख यांचे बंधू धनजंय देशमुख त्यांच्या कुटुंबीयांसह भगवानगडावर दाखल झाले.

देशमुख कुटुंबीयांनी भगवान गडावर पोहचल्यावर संत भगवानबाबा समाधी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी महतं नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली. देशमुख कुटुंब आणि नामदेव शास्त्री महाराज यांच्यामध्ये चर्चा झाली. देशमुख कुटुंबाने हत्या प्रकरणाचे सर्व पुरावे नामदेव शास्त्रीच्या समोर सादर केले. धनजंय देशमुख यांनी 'देशमुख कुटुंबीयांनी कधीही जातीवाद केला नाही. माझ्या भावाकडून दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न झाला' असे म्हटले. तर भगवान गड संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी असल्याचे नामदेव शास्त्री महाराज यांनी सांगितले. तसेच आरोपींना आम्ही पाठिशी घालणार नाही असे आश्वासन शास्त्री महाराज यांनी देशमुख कुटुंबीयांना दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com