बीड शहर हादरलं! न्यायाधीशांच्या निवासस्थान परिसरात दोन गटात फ्री-स्टाईल हाणामारी|Video Viral

Two Groups Clash in Beed: बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात दोन गटात फ्री-स्टाईल हाणामारी झाली. न्यायाधीश आणि पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाजवळ ही घटना घडलीय.

बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सध्याला सोशल मीडियावर व्हायरल झालाय. विशेष म्हणजे न्यायाधीशांच्या आणि पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये हाणामारीची घटना घडलीय. रमेश उर्फ संदीप महादेव इंगोले व त्यांचे दाजी वसंत आत्माराम जुळे, अशी हल्ला झालेल्यांची नावे आहेत. यांच्यावर लोखंडी गज, रॉड, पाईप, लाकडी दांडा, कत्ती व तलवारी यांसारख्या हत्यारांनी हल्ला झाला. विशेष म्हणजे, हा हल्ला न्यायाधीशांच्या तसेच पोलीस अधीक्षक निवासस्थानाच्या परिसरालगत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

न्यायव्यवस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या परिसरातच भरदिवसा एवढ्या मोठ्या संख्येने व्यक्ती शस्त्रांसह येऊन हल्ला करतात आणि दहशत निर्माण करतात, ही बाब अत्यंत गंभीर असून बीड शहरातील कायदा व सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. तक्रारीनुसार, नऊ आरोपी दोन वाहनांमधून घटनास्थळी आले. जुन्या वादाची कुरापत तसेच जमीन खरेदीच्या कारणावरून वाद घालत रमेश इंगोले यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या डोक्यात लोखंडी गज व रॉडने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com