Sangli Lok Sabha: सांगलीच्या जागेचा निर्णय दिल्लीत होणार? बाळासाहेब थोरात महत्त्वाचं बोलले!

Balasaheb Thorat News: ठाकरे गटाने आधीच सांगलीचा उमेदवार जाहीर करुन टाकल्यानं महाविकास आघाडीत तणाव वाढल्याचं बोललं जातंय. त्या पार्श्वभूमीवर नेमकं थोरात यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

सांगली : सांगलीची जागा काँग्रेसही लढवणार का? हा प्रश्न कायम असतानाच आता बाळासाहेब थोरात यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आलीय. बाळासाहेब थोरात यांनी सांगलीची जागा लढण्याबाबत काँग्रेसची आग्रही भूमिका असल्याचं ते म्हटलं. दरम्यान, याचा निर्णय दिल्लीतील वरिष्ठांकडून घेतला जाईल, असंही ते यावेळी म्हणाले. दिल्लीतील वरिष्ठांकडून जो निर्णय येईल, तो आम्हाला मान्य असेल, असं थोरात यांनी यावेळी नमूद केलं. दरम्यान, श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीच्या घोषणेवरुनही त्यांनी टोला लगावला. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही थोरातांनी निशाणा साधला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे गटाने आधीच सांगलीचा उमेदवार जाहीर करुन टाकल्यानं महाविकास आघाडीत तणाव वाढल्याचं बोललं जातंय. त्या पार्श्वभूमीवर नेमकं थोरात काय म्हणाले, त्याचा आढावा या व्हिडीओतून घेणार आहोत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com