Badlapur News: नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा; राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरीतुमरी

Shiv Sena and NCP Leaders Clash : बदलापूर नगरपालिकेच्या सभेत वादग्रस्त वक्तव्यांवरून जबरदस्त वाद झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये वाद झाला आहे.

बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक प्रभाकर पाटील यांनी आक्षेपार्य विधान केल्यामुळे म्हात्रे यांचे भाऊ आणि नगरसेवक वामन म्हात्रे आणि तुकाराम म्हात्रे चांगलेच संतापले. त्यातूनच भर सभागृहात जोरदार हमरी तुमरी झाली. त्याचे पडसाद पालिकेच्या आवारात पाहायला मिळाले.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत पोलिसांसमोरच गोंधळ घातला. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. विशेष म्हणजे सभागृहात राडा झालेला असतानाच पोलिसांच्या उपस्थितीत इतक्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पालिका आवारात शिरलेच कसे? असा सवाल आता उपस्थित होतोय. त्यातून बदलापूर पोलिसांची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर आलीय. दरम्यान वातावरण तापलेलं असतानाच नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. त्यामुळे पुढील राडा टळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com