Attari Border: अटारी बॉर्डरवर पाकची दादागिरी, सलग दुसऱ्या दिवशीही गेट बंद|VIDEO

Pahalgam Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने देशात उपस्थित असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करत त्यांना त्वरित आपल्या देशात परत जाण्याचा आदेश दिला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतातून परत जाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना अटारी सीमेवर अडवण्यात आलं आहे. सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने आपला गेट न उघडल्याने अनेक पाकिस्तानी नागरिक अडकले आहेत. भारत सरकारकडून त्यांच्या मायदेशी परतीसाठी आवश्यक ती सर्व परवानगी देण्यात आली असूनही पाकिस्तानकडूनच त्यांना परत घेतले जात नाहीये.

या घटनेमुळे सीमेवर मोठी घालमेल आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलं, महिला आणि वयोवृद्ध नागरिक या बंदतेमुळे त्रस्त झाले आहेत. अन्नपाणी, औषधं आणि निवारा या मूलभूत गरजांसाठीही त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने कायदेशीर स्ट्रइक करत भारतात असलेले सर्व पाकिस्तानी नागरिकांना दोन दिवसात देश सोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर सर्व पाकिस्तानी नागरिक देश सोडत आहे. मात्र पाकिस्तानच त्यांना परत न घेताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com