Pune Hapus Price: फळांचा राजा पुण्यात दाखल, हापूस आंब्याची १ पेटी ४१,००० रुपयांना

Hapus Mango At Pune Martket: पुणेकरांसाठी गुड न्यूज आहे. पुण्यात हापूस आंब्याचे आगमन झाले. हापूस आंब्याची १ पेटी ४१ हजार रुपयांना विकली गेली.

दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर आज पुण्यातील मार्केट यार्डमध्ये फळांचा राजा म्हणजे हापूस आंबा दाखल झाला. आंब्याची पेटी मार्केटमध्ये येताच व्यापाऱ्यांमध्ये एक उत्साह पाहायला मिळाला. आंब्याची विक्री आणि त्यातून होणारी व्यवसायाची वृद्धी हे पाहता आज आंबा व्यावसायिक आनंदात होते. नोव्हेंबर महिन्यातच आलेला फळांच्या राजाला भाव सुद्धा तितकाच लागला. पुण्यातील मार्केटयार्डमधून हापूस आंब्याच्या पेटीसाठी १५ हजारांवरून सुरू झालेली बोली ४० हजारावर येऊन थांबून अंतिम बोलीमध्ये तब्बल ४१ हजार रुपयांना या पेटीची विक्री झाली. या पेटीसह इतर पेट्यांची सुद्धा यावेळी बोली लावण्यात आली. यंदा दुष्काळामुळे फळाची आवक कमी होण्याची शक्यता मात्र व्यावसायिकांनी न चुकता वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.