सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट शहरात गुरुवारी मांस विक्री बंद ठेवण्याच्या निर्णयाची आजपासून प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. अक्कलकोट नगरपरिषदेने नुकताच यासंदर्भात ठराव मंजूर केला होता. त्यानंतर पहिल्याच गुरुवारी शहरातील सर्व मांस विक्रीची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. श्री स्वामी समर्थांच्या पवित्र नगरीत धार्मिक भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी गुरुवारी मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानुसार दर गुरुवारी मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांवर ५ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. नगरपरिषदेच्या या निर्णयाला शहरातील स्वामी भक्तांकडून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे मांस विक्रेत्यांनीही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी दुकाने स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवली. अक्कलकोटमध्ये या निर्णयामुळे धार्मिक वातावरण अधिक दृढ होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.