Ajit Pawar Death: अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर 'घातपात', आंतरराष्ट्रीय यंत्रणांकडून तपास करा; महिला नेत्याची मागणी

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर 'घातपात' झाला असल्याची शंका सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय नियमक संस्थेने विमान कंपनीला उड्डाणासाठी बंदी घातली होती मग ते विमान अजित पवारांना न्यायला का आलं? जे पायलट अजित पवार यांना नेण्यासाठी येणार होते पण ते न येता दुसरेच पायलट कसे आले? अपघातानंतर अजितदादा यांच्या घड्याळाचे काय झालं? दृश्यमानता कमी होती तर मग लँडिंगचा आदेश कोणी दिला?, असे सवाल उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच अजितदादांचा अपघात हा घातपात असून आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडून याबाबतचा सखोल तपास केला जावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.

दरम्यान, २८ जानेवारीला अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. विमान अपघात झाला त्या दिवशी अजित पवार हे बारामतीकडे निघाले होते. बारामतीत त्यांच्या चार सभा होणार होत्या. त्यासाठी ते सकाळीच साडेसात वाजता मुंबईतून विमानाने रवाना झाले होते. पण हे विमान बारामती विमातळाजवळ पोहचताच कोसळले. विमान कोसळल्यानंतर त्यामध्ये अनेक स्फोट झाले आणि त्याचे अनेक तुकडे झाले. या अपघातामध्ये विमान पूर्णत: जळून खाक झाले होते. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com