Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघात प्रकरणात मोठी अपडेट, विमानाच्या हवाई प्रवास क्षमतेचा तपास होणार

ajit pawar plane crash: अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले. या विमान अपघाताच्या तपासाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. विमानाच्या हवाई प्रवास क्षमतेचा तपास केला जाणार आहे.

अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. विमानाच्या एअरवर्थिनेस म्हणजेच हवाई प्रवासक्षमता आणि विमानाची उड्डाण योग्यतेबाबत तपास होणार आहे. DGCA कडून विमानाच्या एअरवर्थिनेस आणि ऑपरेशनल कंडीशन याबाबत समांतर चौकशी सुरू आहे. तपासाअंती ते विमान उडण्यासाठी सुरक्षित होतं का? याबाबत स्पष्टता येणार आहे. या तपासणीला पुढील १० ते १५ दिवस लागण्याची शक्यता आहे . तपास यंत्रणेकडून खासगी विमान कंपनीच्या विविध कागदपत्रांची पडताळणी होणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारीला अपघात झाला होता. हे विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले. या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. अजित पवार मुंबईवरून बारामतीला सभेसाठी जात होते. जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी ते बारामतीत ४ सभा घेणार होते. पण बारामतीत पोहचण्यापूर्वीच त्यांचे विमान कोसळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com