पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

airplane ticket price hike : पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का बसला आहे. विमान तिकीट दर गगनाले भिडला आहेत.

देशात पहाटे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली. इंधनाच्या दरात वाढ झाल्यानंतर जीवनाश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. भाजीपाल्याचे दर देखील वाढले आहेत. त्यानंतर विमान प्रवास देखील महागल्याचे समोर आलं आहे.

एअर इंडियाकडून जून ते ऑगस्टदरम्यान दरमहा सुमारे ४०० आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती मिळतेय. विमानाची संख्या घटल्याने तिकीट दर गगनाला भिडले आहेत. दिल्ली ते मेलबर्नचं तिकीट २ लाख ७६ हजार रुपयांवर पोहोचलं आहे. मुंबई, दिल्ली, शिकागो आणि न्यूयॉर्क सारख्या प्रमुख मार्गावर फेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे इतर प्रवाशांचे हाल होत आहेत. आता विमान प्रवासासाठी दुप्पट-तिप्पट पैसे मोजावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com