अभिजीत दीपकेंची मुंबईत जेल भरो आंदोलन करण्याची घोषणा | VIDEO

Abhijeet Dipke announces Jail Bharo Andolan: अभिजीत दिपके यांनी २ ऑक्टोबरला मुंबईत ‘जेल भरो’ आंदोलनाची घोषणा केली आहे. CJPच्या प्रस्तावित आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे दिपके यांनी सांगितले

मुंबईत येत्या २ ऑक्टोबरला ‘जेल भरो’ आंदोलन करण्याची घोषणा CJPचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिपके यांनी दिली आहे. मुंबईतील CJPच्या प्रस्तावित आंदोलनाला पोलिसांकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, पोलिसांची परवानगी नसतानाही २ ऑक्टोबरला जेल भरो आंदोलन करण्याची तयारी CJPने केली आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर CJPकडून आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. २ ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या या आंदोलनाला पोलिस परवानगी देतात का आणि परवानगी नसतानाही CJPचे कार्यकर्ते आंदोलन करतात का, याकडे आता लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com