Maharashtra Politics: विधानसभेत 'चड्डी बनियान गँग'वरून राडा! आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यात तुफान जुंपली|VIDEO

Nilesh Rane Reaction To Aaditya Thackeray Statement: विधानसभेत आदित्य ठाकरे यांनी ‘चड्डी बनियान गँग’ असा टोला लगावल्याने गदारोळ झाला. संजय गायकवाड आणि शिरसाट यांचा संदर्भ देत त्यांनी टोलेबाजी केली.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ सुरू आहे. अशातच संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कँटिनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी संजय गायकवाड हे टॉवेल आणि बनियानवर होते. मंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये ते सिगारेट ओढताना दिसत असून पैशांची बॅग देखील होती. ते देखील बनियानवरच होते. यावरून आज आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत यावर टोलेबाजी केली.

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना युतीधर्म पाळणे गरजेच असल्याने त्यांना काही गोष्टी सहन कराव्या लागतात. ज्या लोकांसोबत ते बसलेत ते चड्डा बनियान गँग कुणालाही मारतात, काहीही करतात. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे चांगलेच भडकले. ते म्हणाले की, त्यांनी हे जे काही शब्द वापरले, त्यांनी नेमकी कुणावर कारवाई व्हावी हे सांगावं. नेमकं चड्डी कोण आणि बनियान कोण हे त्यांनी सांगावं. जर नाव घ्यायला भीती वाटत असेल तर सभागृहात असे शब्द वापरू नयेत. असा पलटवार निलेश राणे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com