Jitendra Awhad News | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडणं आव्हाडांना भोवणार?

Jitendra Awhad News | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महाड शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

जितेंद्र आव्हाड यांच्यावर रायगड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड येथे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचाही आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला. यावरुन महाड येथील शहर पोलिस स्टेशनला जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ज्या ठिकाणी खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 साली मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं. त्याचं क्रांती चौकात आंदोलन केलं. पण, यात जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याने दलित समाजबांधवांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com