Badlapur News: चार वर्षांच्या मुलीचं अपहरण करून मध्यप्रदेशात नेणाऱ्या मजुराला २४ तासांत अटक; पोलिसांची धडक कारवाई|VIDEO

4-year-old girl kidnapped over family dispute: बदलापूरमध्ये वादातून अपहरण झालेल्या चार वर्षांच्या मुलीची मध्यप्रदेशातून सुखरूप सुटका करण्यात आली. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी मजूर रणजीत धुर्वेला अटक केली असून त्याच्याविरुद्ध अधिक तपास सुरू आहे.

चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीची अपहरण करून मध्य प्रदेश गाठणाऱ्या रणजीत धूर्वे या मजुराला 24 तासांच्या आत उल्हासनगर आणि बदलापूर पोलीस पथकानं ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची सुटका केलीय. आरोपी रणजीत धुर्वे हा बदलापूर पश्चिमेकडील एका कन्स्ट्रक्शन साईडवर मजुरीचा काम करत होता. त्याच्या बाजूला राहणार कुटुंबाचा रणजीतशी वाद झाला होता आणि या भांडणातूनच रणजीतने त्या मुलीचं अपहरण केल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपयुक्त अमरसिंग जाधव यांनी दिलीय. तसेच यामागे रणजीतचा अजून कोणता उद्देश होता याबाबत पोलीस अधिक चौकशी करतायेत. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी या अपहरणकर्त्याला मध्यप्रदेशमधून अटक केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com