Mumbai Metro Line 14 : कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो कधी धावणार? कोणती स्थानकं असणार? जाणून घ्या सर्व

Mumbai Metro: बदलापूर, अंबरनाथवरून मुंबईत येणाऱ्यांचा प्रवास लवकरच सुसाट होणार आहे. कांजुरमार्ग ते बदलापूरपर्यंत मेट्रो धावणार आहे. पुढच्या वर्षामध्ये या मेट्रोच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे.
Mumbai Metro Line 14 : कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो कधी धावणार? कोणती स्थानकं असणार? जाणून घ्या सर्व
Mumbai Metro 14 Line Updatesaam tv
Published On

बदलापूरवरून मुंबईमध्ये रोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच बदलापूरपर्यंत मेट्रो धावणार आहे. कांजुरमार्ग ते बदलापूर या मार्गावर ही मेट्रो सुरू होणार आहे. एमएमआरडीएमार्फत या मेट्रोचे काम केले जाणार आहे. ३९ किमीच्या या मेट्रो लाईन १४ चे काम एका वर्षामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. ही मेट्रो लाईन मॅजेन्टा लाईन म्हणूनही ओळखली जाणार आहे.

हे महत्त्वाकांक्षी ४५ किमी लांबीचे मेट्रो कॉरिडॉर मुंबईतील कांजूरमार्ग ते ठाणे बदलापूर यांना जोडेल जाणार आहे. हा प्रोजेक्ट मुंबईच्या मेट्रो नेटवर्कचा विस्तार ३३० किमीपेक्षा जास्त करण्याच्या मोठ्या उद्दिष्टाचा एक भाग आहे. मेट्रो लाईन १४ मुळे कांजूरमार्ग आणि बदलापूर दरम्यानचा प्रवास सुपरफास्ट होणार असून प्रवासाचा वेळ खूप वाचणार होणार आहे.

Mumbai Metro Line 14 : कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो कधी धावणार? कोणती स्थानकं असणार? जाणून घ्या सर्व
Mumbai Water Metro : नवी मुंबईतून थेट दक्षिण मुंबईत, मुंबईकरांच्या सेवेत येणार वॉटर मेट्रो, २९ स्थानकं अन् १० मार्ग

कांजुरमार्ग ते बदलापूर हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ दीड ते दोन तासांनी वाचणार आहे. म्हणजेच ज्याठिकाणी प्रवासासाठी त्यांना दोन तास लागत होते. हाच प्रवास एका तासांत होईल. टाईम्स प्रॉपर्टीच्या वृत्तानुसार, एकदा का हा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर ते दररोज सात लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा देऊ शकेल आणि उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी मोठी मदत होईल. सर्व आवश्यक मंजुरी पूर्ण झाल्यानंतर २०२६ मध्ये या मार्गाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरूवात होण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएने या मेट्रो मार्गासाठी आधीच अनेक नियामक पायऱ्या पार पाडल्या आहेत.

Mumbai Metro Line 14 : कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो कधी धावणार? कोणती स्थानकं असणार? जाणून घ्या सर्व
Mumbai Metro: मेट्रो 3 स्टेशन पाण्यात! वरळी, BKC मध्ये गळती थांबेना; पाहा VIDEO

या मेट्रो मार्गासाठी सध्या पर्यावरणीय आणि वन प्रभाव अभ्यास करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करत आहे. हे विशेषतः महत्वाचे आहे कारण हा मार्ग पारसिक हिल्स आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यासह पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांमधून जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाला हानी न पोहचवता हा मेट्रो मार्ग तयार करण्याचा एमएमआरडीएचा मानस असणार आहे.

या प्रकल्पाचा अंदाजे खर्च १८,००० कोटी रुपये होणार आहे. मिलान मेट्रोने तयार केलेल्या आणि आयआयटी बॉम्बेने पुनरावलोकन केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाच्या आधारे तांत्रिक मंजुरी आधीच देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून अंतिम मंजुरीची वाट पाहत आहे. त्यानंतर निविदा मागवल्या जातील. सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत विकसित केलेल्या अंतिम संरचनेचा आढावा अजूनही घेतला जात आहे. जेणेकरून समान प्रकल्पांमध्ये पूर्वी दिसणारी आव्हाने टाळता येतील. खासगी कंपन्यांना बोली सादर करण्याची अंतिम तारीख २८ जुलै आहे.

Mumbai Metro Line 14 : कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो कधी धावणार? कोणती स्थानकं असणार? जाणून घ्या सर्व
Badlapur Metro: बदलापूरकरांची लोकलच्या गर्दीतून होणार सुटका; मेट्रो 14 ची निविदा निघाली; खर्च किती?

कांजुरमार्ग ते बदलापूर या मेट्रो मार्गावर सुमारे ४० स्थानके असणार आहेत. प्रस्तावित स्थानकांपैकी काही स्थानके कांजूरमार्ग, विक्रोळी, महापे, घणसोली, अंबरनाथ आणि बदलापूर ही आहेत. ही स्थानके प्रमुख औद्योगिक आणि निवासी क्षेत्रांना जोडतील. ज्यामुळे पूर्व मुंबईतील कामाच्या ठिकाणी आणि घरांपर्यंत पोहोचणे नागरिकांना अधिक सोपे होईल. कांजूरमार्ग येथे इतर मेट्रो मार्गांसह इंटरचेंज आणि मेट्रो मार्ग क्रमांक ४ आणि ५ शी नियोजित दुवे यामुळे संपूर्ण शहराची कनेक्टिव्हिटी आणखी वाढण्यास मदत होणार आहे.

Mumbai Metro Line 14 : कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो कधी धावणार? कोणती स्थानकं असणार? जाणून घ्या सर्व
Mumbai Metro: मुंबईकरांना मिळणार नवी मेट्रो; मीरा भाईंदरकरांचा प्रवास होणार सुसाट, नेमके किती थांबा अन् तिकीटांचे दर किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com