
आयपीलएलमध्ये १३ वा सामना लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यामध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्जने या ८ विकेट्सने विजय मिळवला. क्रिकेट हा जेंटलमन गेम असून अनेकदा खेळाडूंमध्ये वाद होतानाही दिसतात. कधी भर मैदानात भांडणं होतात तर काहीवेळा अपशब्दही वापरले जातात. असंच काहीसं चित्र लखनऊ विरूद्ध पंजाब या सामन्यात पहायला मिळालं. या सामन्यात पंजाबचा गोलंदाज युजवेंद्र चहलला त्याच्या रागावर नियंत्रण ठेवता आलं नाही.
पंजाबविरूद्धच्या सामन्यात लखनऊचे फलंदाज फेल ठरले. एकाना खेळपट्टीवर एलएसजीचे फलंदाज बाद होत असताना निकोलस पूरनने मात्र एक बाजू धरून ठेवली होती. पण शेवटी चहलने पूरनची विकेट काढली. यादरम्यान चहलला रागावर नियंत्रण ठेवता आलं नाही. यावेळी पूरन पव्हेलियनमध्ये जात असताना चहलने शिवीगाळही केली.
टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केल्यानंतर पंजाब किंग्जने पहिल्याच ओव्हरमध्ये मिचेल मार्शला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. या सामन्यात निकोलस पूरन तिसऱ्या क्रमांकावर आला. पहिल्या बॉलपासून तो संयमी दिसत होता. मात्र त्याने त्याने आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. पूरनचा खेळ पाहता कर्णधार अय्यरने चहलला १२ वी ओव्हर टाकण्यास बोलावलं. यावेळी ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर चहलने पूरनला आऊट केलं.
पूरनची विकेट घेतल्यानंतर युजवेंद्र चहलला त्याचा राग आवरता आला नाही आणि तो पूरनकडे पाहत काही अपशब्द वापरले. मात्र यावेळी पूरनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे प्रकरण वाढलं नाही आणि पूरन तिथून थेट पॅव्हेलियनमध्ये परतला.
पहिल्याच ओव्हरमध्ये फलंदाजीला येताच निकोलस पूरनने संथ गतीने खेळायला सुरुवात केली. मात्र सेट झाल्यानंतर पूरनने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने ३० चेंडूंचा सामना केला आणि ४४ रन्स केले. यामध्ये एकूण ५ चौकार आणि २ सिक्सेसचा समावेश होता. तर त्याचा स्ट्राईक रेटही १४६.६६ होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.