
मंगळवारी झालेल्या सामन्यात ऋषभ पंत पुन्हा एकदा फेल झाल्याचं पाहायला मिळालं. लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्या सामन्यात पंजाबचा ८ विकेट्सने विजय झाला. दरम्यान या सामन्यात पराभ स्विकारल्यानंतर लखनऊचे मालक संजीव गोएंका आणि ऋषभ पंत यांना मैदानावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी संजीव गोएंका पंतला काहीतरी सांगत असल्याचं समोर आलं आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनध्ये संजीव गोयंका यांनी २७ कोटी रूपये मोजून ऋषभ पंतला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनवलं. इतका मोठा जॅकपॉट मिळून देखील ऋषभ पंतचा खेळ काही सुधारायचं नाव घेत नाही. २७ कोटी रुपयांच्या मानधनाच्या बदल्यात पंतला आतापर्यंत २७ रन्सही करता आलेले नाहीत.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ० आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात १५ रन्सवर बाद झाल्यानंतर रात्री पंजाब किंग्जविरुद्ध पाच चेंडूत फक्त दोन धावा काढून पंत बाद झाला. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर जेव्हा कॅमेरामनने स्टेडियममध्ये असलेल्या संजीव गोयंकावर स्पॉट केलं त्यांचा चेहरा खिन्न दिसत होता.
सामना संपल्यानंतर गोएंका मैदानावर आले आणि ऋषभ पंतशी चर्चा करू लागले. यावेळी ते बोट दाखवून पंतशी बोलत असल्याने ऋषभ पंतवर ते संतापले होते का असा सवाल यावेळी उपस्थित झाला. यावेळी काय चूक झाली हे समजून घेण्याचा प्रयत्न ते करत असावेत असा अंदाज लावण्यात येतोय. सामन्यानंतर पंतने स्वतः कबूल केलं की, स्कोअरबोर्डवर कमी रन्स करणं हे पराभवाचं कारण होते.
निकोलस पूरनच्या ४४ आणि आयुष बदोनीच्या ४१ रन्सच्या जोरावर सुपर जायंट्सने सात विकेट गमावून १७१ रन्स केले. यावेळी बदोनीने डेथ ओव्हर्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर पंजाब किंग्जने फक्त १६.२ ओव्हर्समध्ये दोन विकेट्स गमावून १७७ रन्स केले. या सामन्यात प्रभसिमरन सिंगने ३४ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार श्रेयस अय्यरने चांगली साथ दिली. अय्यरने ३० चेंडूत चार सिक्स आणि तीन फोर्ससह ५२ रन्स केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.