
एकना स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना रंगला आहे. या सामन्यामध्ये लखनऊचा कर्णधार रिषभ पंत २ धावा करुन माघारी परतला आहे. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्येही रिषभ लवकर बाद झाला होता. आजच्या सामन्यातही तो फेल झाला आहे. खराब कामगिरीमुळे सोशल मीडियावर रिषभ पंतला ट्रोल केले जात आहे.
लखनऊ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांची बोली लावून संघात सामील केले होते. त्यामुळे या वर्षी त्याच्याकडून लखनऊच्या संघाला खूप अपेक्षा होत्या. पण सुरुवातीला रिषभ पंतने अपेक्षाभंग केल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या सामन्यात रिषभ शून्यावर बाद झाला, दुसऱ्या सामन्यात १५ धावा करुन माघारी परतला आणि तिसऱ्या म्हणजेच आजच्या सामन्यात त्याने फक्त २ धावा केल्या आहे. या खेळावरुन रिषभ पंतने लखनऊचे २७ कोटी रुपये पाण्यात बुडवले असे नेटकरी म्हणत आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स हा आयपीएल २०२५ मधील ११ वा सामना आज एकना क्रिकेट स्डेटियम, लखनऊ येथे खेळला जाणार आहे. घरच्या स्टेडियममध्ये हा सामना खेळला जात असल्याने लखनऊच्या संघाचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही संघांनी त्यांच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवला होता. आता पुन्हा विजयी होण्यासाठी लखनऊ आणि पंजाब हे दोन्ही संघ झुंज देणार आहेत.
लखनऊची प्लेईंग ११ -
रिषभ पंत (कर्णधार), एडम मारक्रम, निकोलस पूरन, आयुष बडोनी, मिचेल मार्श, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश राठी, आवेश खान, रवी बिश्नोई
पंजाबची प्लेईंग ११ -
श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.