
Virat Kohli : वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराट कोहलीने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ टीम इंडियाने जिंकली. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट वनडे फॉरमॅटमधूनही निवृत्ती घेईल का अशी चर्चा होती. सोशल मीडियावरही विराट कोहलीच्या निवृत्तीच्या घोषणेची चर्चा होती. अशा चर्चा सुरु असताना खुद्द किंग कोहलीने एका कार्यक्रमामध्ये निवृत्तीसंबंधित वक्तव्य केले आहे.
विराट कोहली सध्या आयपीएल २०२५ मध्ये व्यस्त आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सदस्य आहे. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विराटने दमदार कामगिरी केली. एका सामन्यात त्याने अर्धशतक देखील केले. याच दरम्यान विराट एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. या कार्यक्रमातला विराटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विराटला next big step? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विराट कोहलीने maybe try to win the 2027 World Cup असे उत्तर दिले. थोडक्यात मी २०२७ वर्ल्डकप खेळणार असल्याचे विराटने म्हटले आहे. या वक्तव्यामुळे विराटने निवृत्तीच्या चर्चा थांबतील असे म्हटले जात आहे.
टीम इंडियाकडून विराट कोहली १२३ टेस्ट सामने खेळला आहे. यात त्याने ९२३० धावा केल्या आहेत. टेस्टमध्ये ३० शतक आणि ३१ अर्धशतक कोहलीच्या नावावर आहेत. वनडेचा विचार करता, विराटने ३०२ वनडे सामन्यांमध्ये एकूण १४,१८१ धावा केल्या आहेत. वनडे फॉरमॅटमध्ये त्याने ५१ शतक आणि ७४ अर्धशतक असा विक्रमी खेळ केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.