
यंदाच्या सिझनमध्ये मुंबईच्या टीमला आतापर्यंत ३ सामन्यांपैकी एक सामना जिंकता आला. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरही यावेळी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये दिसून येतोय. ज्यावेळी सामना मुंबईमध्ये असतो त्यावेळी मुंबईच्या ताफ्यात सचिन दिसून येतो. मात्र यावेळी आश्चर्याची बाब म्हणजे मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर अजूनही दिसला नाही.
यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये मुंबईचे ३ सामने झाले आहे. मात्र यावेळी अर्जून तेंडुलकर आतापर्यंत आपल्या टीमकडून एकही सामना खेळू शकलेला नाही. दरम्यान, तिसऱ्या सामन्यात जे घडले त्यानंतर आता अर्जुनला लवकरच प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
गेल्या वर्षी आयपीएलच्या ऑक्शनमध्ये अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांना विकत घेतलं होतं. पहिल्या फेरीत त्याला खरेदीदार मिळाला नाही. मात्र अखेरीस मुंबईच्या टीमने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.
३० लाखांच्या बेस प्राईजला खरेदी करून देखील अर्जुनला आतापर्यंत एकाही सामना खेळता आलेला नाही. अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. दरम्यान रविवारी केकेआरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आयपीएलमध्ये डेब्यू करणाऱ्या अश्वनी कुमारने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. इतकेच नाही तर या सामन्यात त्याने चार विकेट्स घेतल्या. अशी कामगिरी करणारा तो भारतातील पहिला गोलंदाज ठरलाय.
अश्वनी कुमार ज्या पद्धतीने खेळला त्यानंतर त्याला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. याशिवाय टीममध्ये ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहरसारखे गोलंदाज आहेत. त्यामुळे टीममध्ये तीन वेगवान गोलंदाज आहेत. हे गोलंदाज असताना अर्जुन तेंडुलकरला टीमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. सध्या जसप्रीत बुमराह टीममध्ये नसला तरी तो काही दिवसांनी कमबॅक करण्याची शक्यता आहे. त्यावेळी अर्जुनच्या संधी मिळण्याची शक्यता नाही.
अर्जुन तेंडुलकरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक सामने खेळलेत. यावेळी त्याने गोलंदाजीसोबत रन्स देखील केलेत. पण आयपीएलमध्ये त्याला काही खास कामगिरी करता आलेली नाही. आयपीएलमध्ये त्याने पाच सामने खेळले असून तीन विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीमध्ये अर्जुनने 13 रन्स केलेत. त्यामुळे आता पुढच्या सामन्यांमध्ये हार्दिक त्याला संधी देणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.