Yashasvi Jaiswal Century: 'बॅझबॉलवर भारी जयस्वाल', इंग्लंडविरुद्ध ठोकलं बॅक टू बॅक शतक

Yashasvi Jaiswal Century News: गेल्या सामन्यातील पहिल्या डावात दुहेरी शतक झळकावणाऱ्या यशस्वी जयस्वालने या सामन्यातील दुसऱ्या डावात शतक झळकावलं आहे.
yashasvi jaiswal
yashasvi jaiswal twitter
Published On

India vs England 3rd Test, Yashasvi Jaiswal Century:

बॅझबॉलवर पुन्हा एकदा जयस्वाल भारी पडला आहे. गेल्या सामन्यातील पहिल्या डावात दुहेरी शतक झळकावणाऱ्या यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) या सामन्यातील दुसऱ्या डावात शतक झळकावलं आहे. त्याने या डावात १२२ चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने १०० धावांची खेळी केली आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक ठरले आहे.

भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ४४५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ३१९ धावांवर संपुष्टात आला. यासह भारतीय संघाने १२६ धावांची आघाडी घेतली. दरम्यान दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अवघ्या १९ धावा करत माघारी परतला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहचवलं. (Cricket news in marathi)

yashasvi jaiswal
IND vs ENG 3rd Test: आर अश्विनने माघार का घेतली? खरं कारण आलं समोर

भारत -इंग्लंड कसोटीत जयस्वालचा जलवा..

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वालच्या फलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीतील पहिल्याच डावात त्याने ८० धावांची खेळी केली. तर मालिकेतील दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने दुहेरी शतकी खेळी केली होती.

yashasvi jaiswal
IND vs ENG 3rd Test: तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाला १० खेळाडूंसह खेळावं लागणार; मोठं कारण आलं समोर

आता मालिकेतील तिसऱ्या सामन्यातील तिसऱ्या डावात त्याने नाबाद शतकी खेळी केली आहे. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी जयस्वाल अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये ४०० हून अधिक धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com