ऋद्धीमान साहाला पत्रकाराची धमकी; शेअर केला स्क्रीनशॉट

साहाने आपले म्हणणे मांडले आहे आणि पत्रकारितेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Wriddhiman Saha
Wriddhiman SahaSaam TV
Published On: 

ऋद्धीमान साहाने (Wriddhiman Saha) सध्या फार चर्चेत आहे. त्यातलं एक कारण आहे त्याला श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघात जागा मिळाली नाहीये. तर दुसरीकडे गांगुली आणि द्रविड यांच्या बद्दलचे म्हणणे मीडियात प्रसिद्ध झाले आहे. आणि अजून एक तिसरे कारण आहे त्याचा संबंध वरील कारणांशी आहे. भारताच्या यष्टीरक्षक फलंदाजाने एका पत्रकाराशी केलेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो वादात सापडल्यानंतर त्याच्यावर मुलाखतीसाठी दबाव टाकत होता. त्याला उत्तर न दिल्याने तो अभद्र काहीतरी बोलत असे. साहाने आपले म्हणणे मांडले आहे आणि पत्रकारितेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

भारतीय कसोटी (Team India) संघातून वगळल्यानंतर अशा बातम्यांनी जोर धरला होता की गांगुलीने साहाला सांगितले होते की जोपर्यंत तो बीसीसीआयमध्ये (BCCI) आहे तोपर्यंत त्याला काळजी करण्याची गरज नाही. त्याचवेळी आणखी एक बातमी आली की द्रविडने त्याला निवृत्तीचा विचार करण्यास सांगितले आहे.

साहाने पत्रकाराशी झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट केला शेअर

या सर्व बातम्यांनी दुखावलेल्या ऋद्धिमान साहाने लगेच सोशल मीडियावर आपली मत मांडले आहे. पत्रकाराशी झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर करत त्याने ट्विट केले की, “भारतीय क्रिकेटमधील माझ्या सर्व योगदानासाठी पत्रकारांनी मला हा धडा दिला आहे. पत्रकारिता कोणत्या दिशेने चालली आहे ते यातून कळते आहे.

साहा श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर

भारतीय निवड समितीने 19 फेब्रुवारीच्या संध्याकाळी श्रीलंकेविरुद्धच्या T20 आणि कसोटी मालिकेसाठी संघाची निवड केली होती, ज्यामधून ऋद्धिमान साहाला वगळण्यात आले आहे. साहासाठी हे आश्चर्यकारक नव्हते कारण राहुल द्रविडने दक्षिण आफ्रिकेतच निवड समितीच्या या निर्णयाची माहिती दिल्याचे त्याने सांगितले. स्पोर्ट्स स्टारला दिलेल्या मुलाखतीत साहा म्हणाला होता, “न्युझीलंडविरुद्धच्या कसोटीनंतर दादाने (गांगुली) माझे अभिनंदन केले. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. अशा परिस्थितीत जेव्हा राहुल द्रविडने दक्षिण आफ्रिकेत बोलावले तेव्हा तो पुढील नियोजनाबद्दल बोलेल असे मला वाटले.

श्रीलंकेविरुद्ध संघ निवडल्यानंतर साहाला वगळण्याच्या निर्णयाचे कारण भारतीय निवडकर्त्यांना विचारले असता त्यांनी सांगण्यास नकार दिला. मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा म्हणाले की, “हे आमचे काम आहे. आम्ही तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही."

कसोटीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, शुभमन गिल, केएस भरत, अश्विन (फिटनेसच्या वर), रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com