Wrestlers Protest: आमची तेवढी पात्रता नाही का? क्रिकेटपटूंचा पाठिंबा न मिळाल्याने विनेश फोगाट नाराज

Vinesh Phogat Statement: विनेश फोगाटने मोठे वक्तव्य केले आहे.
vinesh phogat
vinesh phogatsaam tv
Published On

Wrestlers Protest Delhi: रेसलींग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी कुस्तीपटू आंदोलन करताना दिसून येत आहेत. खेळाडूंना न्याय मिळावा म्हणून दिल्लीत हे आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाला राजकीय क्षेत्रातूनही प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे.

मात्र एकही क्रिकेटपटूने पुढे येऊन त्यांच्यासाठी आवाज उचलला नाही, याची खंत आता कुस्तीपटू विनेश फोगाटने व्यक्त करत मोठे वक्तव्य केले आहे.

vinesh phogat
Wrestling league In Kalyan: मलंगगडमध्ये रंगला कुस्तीचा थरार; १०० पेक्षा अधिक पैलवानांचा सहभाग...

देशात कुठल्याही मोठ्या घटना घडतात त्यावेळी क्रिकेटपटू आणि खेळाडू त्या घटनेला पाठिंबा देताना दिसतात. तसेच आपली प्रतिक्रिया देताना दिसनू येत असतात. मात्र हे आंदोलन सुरु असताना एकाही क्रिकेटपटूने आपली प्रतिक्रिया दिली नाहीये.

ब्लॅक लिव्ह्स मॅटरचे उदाहरण देत विनेश फोगाटने म्हटले की, 'आपल्या देशात दिग्गज खेळाडू नाहीत असं मुळीच नाही. असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी अमेरिकेतील ब्लॅक लिव्ह्स मॅटर चळवळीला पाठिंबा दर्शविला होता. आमची तेवढी पण लायकी नाही का? कुस्तीपटू जेव्हा पदक मिळवतात, क्रिकेटपटू त्यांचं कौतुक करतात ट्विट देखील करतात. आता खेळाडूंना सिस्टमची इतकी भीती का वाटतेय.?' (Latest sports updates)

vinesh phogat
Sport News : W, W, W, W, W... विजयासाठी फक्त ४ धावांची गरज; मग ५ चेंडूत धडाधड पडल्या ५ विकेट्स, पाहा VIDEO

पिटी उषा बद्दल बोलताना काय म्हणाली विनेश फोगाट म्हणाली की, 'आम्ही संविधानानुसार जगतो आम्ही स्वतंत्र नागरिक आहोत. आम्ही कुठे ही जाऊ शकतो. आम्ही जर बाहेर बसलो आहे तर नक्कीच काहीतरी कारण असावं. आमचं म्हणणं कोणीच ऐकून घेत नाहीये, यामागे देखील काहीतरी कारण असावं. मी पिटी उषा यांना फोन देखील केला होता. मात्र त्यांनी माझा फोन उचलला नव्हता.'

पिटी उषा काय म्हणाल्या होत्या?

पीटी उषा म्हणाल्या होत्या की, 'भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) कडे लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी एक समिती आहे. खेळाडूंनी आंदोलन आणि रस्त्यावर उतारण्याऐवजी आमच्याकडे येऊ शकले असते, पण ते आले नाहीत. केवळ कुस्तीपटू नव्हे तर खेळाडूंसाठी देखील हे खूप चुकीचं आहे. त्यांना थोडी शिस्त असावी.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com