Wrestling league In Kalyan: मलंगगडमध्ये रंगला कुस्तीचा थरार; १०० पेक्षा अधिक पैलवानांचा सहभाग...

Wrestling league In Kalyan: कुस्ती खेळला चालना देण्यासाठी मलंगगड मध्ये ‘कुस्ती लिग’ स्पर्धेचे आयोजन..
Wrestling league In MalangGadh, Kalyan
Wrestling league In MalangGadh, Kalyanप्रदीप भणगे
Published On

कल्याण: कोरोनामुळे गेल्या सुमारे दोन वर्षांपासून बंद पडलेले कुस्ती (Wrestling) क्षेत्राला चालना देण्यासाठी ग्रामीण भागातील कुस्तुतीगीर संघाचे अध्यक्ष योगेश मढवी यांनी ‘कुस्ती लिग’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या एक दिवसीय लीग मध्ये ठाणे, रायगड, सह राज्यभरातील पैलवानांनी (wrestler) हजेरी लावली होती. (Sports In Kalyan) या स्पर्धेत १०० पेक्षा अधिक पैलवानांचा सहभाग घेतला होता. कोरोनाच्या कालखंडापासून बंद झालेल्या कुस्त्या पुन्हा सुरु झाल्याने पैलवानांच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (wrestling thrill in Malanggad; More than 100 wrestlers participate ...)

हे देखील पहा -

ग्रामीण भागातील तरुणाईच्या आवडीचा खेळ असलेल्या कुस्ती कोरोनाच्या कालखंडापासून बंद झाला होता. दररोज सततचे सराव सुरु होते. मात्र कुस्त्या कधी सुरु होतील असा प्रश्न पैलवानांना पडलेला होता. त्यामुळे अंबरनाथ (Ambernath) तालुका कुस्तीगीर संघ आणि स्व. काळूराम मढवी व्यामशाळा उसाटने यांच्या वतीने एकदिवसीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैलवानांनी उपस्थितीत लावून लाल मातीत खेळण्याचा आनंद घेतला आहे. या स्पर्धेत स्पर्धक जिंकला आणि हरला तरी सुद्धा दोघांना बक्षीस देऊन यंदा उसाटने येथे पैलवानांचे गौरव करण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक व श्री मलंगगड (Malang Gad) क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेश गायकवाड, शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख अशोक महाराज म्हात्रे, कुस्तीगीर संघाचे सचिव रणजित म्हात्रे, विजय भाने यांसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, पैलवान उपस्थित होते.

Wrestling league In MalangGadh, Kalyan
Black stork Bird: भंडारा जिल्ह्यात युरोपीयन पाहुणे; प्रथमच अवतरले 'ब्लॅक स्टोर्क' पक्षी...

दरम्यान कल्याण (Kalyan) लोकसभा क्षेत्रात असलेल्या अनेक गावांमध्ये व्यायामशाळा आहेत. अनेक गावांमधील पैलवानांनी राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय पदक मिळवली आहेत. त्यामुळे कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे हे गावागावातील पैलवानांची आवश्यक असणाऱ्या व्यायामशाळा आणि लाखोंच्या घरात असलेली मॅट उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे पैलवानांच्या खेळण्यात देखील उत्साह येत आहे. अन्य काही मदत आवश्य असल्यास कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि महेश गायकवाड हे पैलवानांना मदत करण्यासाठी उभे असणार असल्याचे महेश गायकवाड यांनी सांगितले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com