Wimbledon 2024: कार्लोस अल्कराझने रचला इतिहास! जोकोविचला दुसऱ्यांदा पराभूत करत पटकावलं जेतेपद

Wimbledon 2024 Novak Djokovic : विम्बल्डन २०२४ सुरू होण्याच्या सुमारे ३ आठवडे आधी, ३७ वर्षीय सर्बियन दिग्गज नोव्हाक जोकोविचला त्याच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्याला फ्रेंच ओपनदरम्यान दुखापत झाली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचेल हे जोकोविचलाही वाटत नव्हतं.
Wimbledon 2024: कार्लोस अल्कराझने रचला इतिहास! जोकोविचला दुसऱ्यांदा पराभूत करत पटकावलं जेतेपद
Novak Djokovic PTI
Published On

स्पेनचा युवा टेनिसस्टार कार्लोस अल्काराझने सलग दुसऱ्या वर्षी विम्बल्डनचे विजेतेपद पटकावलंय. या २१ वर्षीय अल्काराझने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत ७ वेळा चॅम्पियन राहिलेला सर्बियाचा अनुभवी टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा ६-२, ६-२, ७-६ (७-४) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. जोकोविचचा पराभव करत अल्काराझने चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलंय.

गेल्या वर्षाच्या अंतिम फेरीतही अल्काराझने जोकोविचचा पराभव केला होता. अल्काराझने यंदा सलग दुसरे ग्रँडस्लॅम जिंकले आहे. गेल्या महिन्यातच त्याने प्रथमच फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावलं होतं. ३७ वर्षीय नोव्हाक जोकोविच या विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरी गाठेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. 3 जून रोजी, फ्रेंच ओपन दरम्यान त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याने स्पर्धेतून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर ५ जून रोजी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा स्थितीत जोकोविच या स्पर्धेत एखादा विजय मिळवेल हेही वाटत नव्हतं. तरीही त्याने हा अप्रतिम पराक्रम दाखवत अंतिम फेरी गाठली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com