Kohli-Gambhir Altercation: जोरदार राडा होऊनही विराटला १ कोटी तर नवीन अन् गंभीरला निम्यापेक्षाही कमी दंड! असा भेदभाव का?

Virat Kohli Fined: या वादानंतर विराट कोहलीला कोट्यवधींचा फटका बसला आहे.
virat kohli
virat kohlisaam tv
Published On: 

LSG VS RCB IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ४३ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रंगला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाती; गोलंदाजांनी कमी धावांचा बचाव करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला जोरदार विजय मिळवून दिला.

दरम्यान हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयामुळे कमी तर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात रंगलेल्या वादामुळे जास्त चर्चेत ठरला. दरम्यान या वादानंतर विराट कोहलीला कोट्यवधींचा फटका बसला आहे. (Latest sports updates)

virat kohli
Virat Kohli vs Gautam Gambhir: स्वतःचा मॅन ऑफ द मॅच अवाॅर्ड विराटला देणारा गंभीर, अचानक विराट सोबत भांडू का लागला?

जोरदार वाद झाल्यानंतर आता बीसीसीआयने विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हकवर मोठी कारवाई केली आहे. बीसीसीआयने गौतम गंभीर आणि विराट कोहलीवर मॅच फिच्या १०० टक्के तर नवीन उल हक वर ५० टक्के दंड ठोठावला आहे. म्हणजेच विराट कोहलीवर तब्बल १.७ कोटी रुपये इतका दंड ठोठावला गेला आहे.

तर गौतम गंभीरवर २५ लाख आणि नवीन उल हक वर १.७९ कोटी इतका दंड ठोठावला गेला आहे. विराटला एक सामना खेळण्याचे १.७ कोटी रुपये मिळतात. तर गौतम गंभीर २५ लाख आणि नवीन उल हकला १.७९ कोटी रुपये मिळतात.

virat kohli
Virat Kohli Instagram Story: मैदानात बाचाबाची, आता सोशल मीडियावर जोरदार राडा! विराट अन् नवीनची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल

हा सामना सुरु असताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची सुरु होती. सामना सुरु असताना दोघे एकमेकांना काहीतरी बोलताना दिसून आले होते. ज्यावेळी सामना संपला, सर्व खेळाडू हात मिळवणी करत होते त्यावेळी देखील विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची सुरु असल्याचे पाहायला मिळाले होते.

हा वाद इतका चिघळला होता की, संघातील इतर खेळाडूंना मध्यस्ती करावी लागली होती. जेव्हा विराट कोहली आणि गौतम गंभीर हे दोघे आमने सामने आले. त्यावेळी देखील वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते.

virat kohli
Who Is Naveen Ul Haq: Virat सोबत पंगा घेणारा अवघ्या २३ वर्षांचा Naveen आहे तरी कोण? यापूर्वी देखील मैदानात केलाय राडा..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा विजय

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ९ गडी बाद १२६ धावा केल्या होत्या. आय संघाकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ४४ धावांची केली होती.

या धावांचा पाठलाग करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघाला अवघ्या १०८ धावा करता आल्या. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १८ धावांनी विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.