Rohit Sharma Statement: वनडेत सुपरफ्लॉप,तरीही सूर्याला का मिळतोय चान्स? स्वत: रोहितने सांगितलं कारण

Rohit Sharma On Suryakumar Yadav: काय आहे यामागचं कारण? स्वतः रोहितने याबाबत खुलासा केला आहे.
rohit sharma on suryakumar yadav
rohit sharma on suryakumar yadavsaam tv
Published On: 

Rohit Sharma Statement On Suryakumar Yadav:

सूर्यकुमार यादव हा टी -२० क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाज अजे. टी -२० क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत धावांचा पाऊस पाडला आहे. हेच कारण आहे की, आयसीसीच्या टी -२० फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे.

मात्र वनडे क्रिकेटमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. तरीदेखील त्याला भारतीय वनडे संघात सातत्याने संधी दिली जात आहे. काय आहे यामागचं कारण? स्वतः रोहितने याबाबत खुलासा केला आहे.

rohit sharma on suryakumar yadav
Shikhar Dhawan Reaction: 'मला मोठा धक्काच बसला..', संघातून वगळल्यानंतर शिखर धवन पहिल्यांदाच झाला व्यक्त, म्हणाला...

भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे सूर्यकुमार यादवला सातत्याने संधी दिली जात आहे. तो फ्लॉप ठरत असला तरीदेखील टीम मॅनेजमेंट त्याच्यावर विश्वास दाखवत आहे.

भारतीय संघचा कर्णधार रोहित शर्माने मुंबईतील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तो म्हणाला की, सूर्यकुमार यादव आपल्या गेममध्ये सुधारणा करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतोय. यासाठी तो वरीष्ठ खेळाडूंसोबत चर्चा करतोय. जे हे फॉरमॅट खेळले आहेत, त्या खेळाडूंकडून तो टिप्स घेतोय. ' (Latest sports updates)

rohit sharma on suryakumar yadav
Team India News: एशिया कप २१ तर वर्ल्डकप ५७ दिवसांवर, टीम इंडियाला केव्हा मिळणार परफेक्ट प्लेइंग ११; काय आहेत आव्हानं? वाचा सविस्तर

तसेच तो पुढे म्हणाला की, ' सूर्यकुमार यादव हा उत्कृष्ट फलंदाज आहे आणि त्याच्यासारख्या फलंदाजांना आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी संधी द्यावी लागते. त्याला आयपीएल २०२३ स्पर्धेत चांगली सुरुवात करता आली नव्हती. मात्र त्यानंतर त्याने काय केलं हे सर्वांनी पाहिलं.'

वनडे वर्ल्डकप स्पर्धा यावेळी भारतात रंगणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

वर्ल्डकप जिंकण्याबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ' वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. २०११ नंतर आम्ही तेच करतोय. संघातील प्रत्येक खेळाडू मैदानात उतरून वर्ल्डकप जिंकण्यासाठी उत्सुक आहे. आम्हाला असा आत्मविश्वास आहे की, आम्ही वर्ल्डकप जिंकू शकतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.