Ishant Sharma IPL 2025 : इशांत शर्मावर BCCIची मोठी कारवाई; नेमकं काय चुकलं? मिळाली 'ही' मोठी शिक्षा

Ishant Sharma IPL 2025 : इशांत शर्माला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला. पण, आयपीएलने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये या घटनेचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यात फक्त एवढेच म्हटले होते की इशांतने त्याचा गुन्हा कबुल केला आहे.
ishant sharma handed 25 percent fine
ishant sharma handed 25 percent fine Saam Tv News
Published On

Ishant Sharma IPL 2025 : आयपीएल २०२५च्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सने पराभव केला. गुजरातने चालू हंगामातील हा सलग तिसरा सामना जिंकला. या सामन्यात मोहम्मद सिराज आणि शुभमन गिल यांनी संघासाठी चांगली कामगिरी केली. तर इशांत शर्मा खूप महागडा ठरला आणि त्याने खुप धावा दिल्या. मात्र विजयानंतर बीसीसीआयने एका कारणास्तव इशांतवर कारवाई केली आहे आणि दंड ठोठावला आहे.

या सामन्यादरम्यान, इशांत शर्माला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला. पण, आयपीएलने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये या घटनेचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यात फक्त एवढेच म्हटले होते की इशांतने त्याचा गुन्हा कबुल केला आहे. त्याला लेव्हल १चा दोषी आढळला आहे. इशांतने त्याची चूक मान्य केल्यामुळे, यावर पुढील सुनावणी होणार नाही. शिक्षा म्हणून, त्याला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

ishant sharma handed 25 percent fine
LPG Price Hike : पेट्रोलनंतर गॅसचा भडका; घरगुती सिलिंडर ५० रुपयांनी महागला

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध इशांत शर्माने खूपच खराब कामगिरी केली. त्याने त्याच्या ४ षटकांत ५३ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. कर्णधार शुभमन गिलने त्याचा प्रभावशाली खेळाडू म्हणून वापर केला आणि त्याच्या जागी शेरफेन रदरफोर्डला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले. आयपीएल २०२५ मध्ये इशांतची कामगिरीही काही खास राहिली नाही. चालू हंगामात त्याने आतापर्यंत तीन सामन्यांत फक्त एकच विकेट घेतली आहे.

चालू आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचा हा सलग तिसरा विजय आहे. संघाने आतापर्यंत एकूण चार सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन जिंकले आहेत आणि एक गमावला आहे. त्याचा ६ गुणांसह नेट रन रेट अधिक आहे. हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

ishant sharma handed 25 percent fine
Indapur Politics: महायुतीत मिठाचा खडा पडणार! अजित पवारांच्या बैठकीनंतर खलबतं; मित्रपक्षच शड्डू ठोकणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com