

Sachin Tendulkar Childhood Story: भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. २४ वर्षे त्याने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं.
यादरम्यान त्याने भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. सचिन तेंडुलकरची कमाई कोट्यवधींच्या घरात आहे. त्याच्याकडे जगातील सर्वात महागड्या कार्सचे कलेक्शन आहे. मात्र लहानपणी सचिनला सायकल मिळवण्यासाठी देखील हट्ट करावा लागला होता.
लहानपणी प्रत्येकाची अशी ईच्छा असते की, आपल्याकडे स्वतःची सायकल असावी. तुमच्या आमच्या सारखीच सायकल घेण्याची इच्छा मास्टर बास्टर सचिन तेंडुलकरालाही होती. बालपणी सचिन वडिलांकडे सायकलीसाठी हट्टा करायचा.
मात्र वडीलांनी त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही. वडिलांकडून वारंवार आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं पाहून, सचिनला भयंकर राग आला. सायकल नाही मिळाली तर बाहेर खेळायलाच जायचं नाही, असं त्याने ठरवलं. बाल्कनीत उभं राहून तो मित्रांना सायकल चालवताना पाहायचा.
एक दिवस बाल्कनीत उभा असताना सचिनचं डोकं बाल्कनीच्या ग्रीलमध्ये फसलं. त्यामुळे घरचे सर्व घाबरले. त्यावेळी सचिनचं घर चौथ्या मजल्यावर होतं. तब्बल ३० मिनिटे सचिनचं डोकं बाल्कनीत फसलं होतं. डोकं काही केल्या बाहेर निघत नव्हतं, त्यावेळी तेल लावून लावून त्याचं डोकं बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्या वडिलांनी अखेर त्याला सायकल विकत घेऊन दिली होती. (Latest sports updates)
१०० कोटींच्या घरात राहतो मास्टर ब्लास्टर..(Sachin Tendulkar House In Mumbai)
सचिन आपल्या कुटुंबासह वांद्रे येथील एका अलिशान बंगल्यात राहतो. सचिनने हा अलिशान बंगला २००७ मध्ये खरेदी केला होता. त्यावेळी या घराची किंमत ३९ कोटी रुपये होती. मात्र आता या घराची किंमत १०० कोटीच्या रूपयांच्या घरात पोहोचली आहे.
यासह त्याचा बीकेसीमध्ये फ्लॅट देखील आहे. या फ्लॅटची किंमत ८ कोटी रुपये इतकी आहे. माध्यमातील वृत्तानुसार सचिनचे केरळमध्ये देखील घर आहे. या घराची किंमत सुमारे ७८ कोटी रुपये इतकी आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.