Suryakumar Yadav: मी काय बोलणार त्याच्याविषयी…; रोहित शर्माच्या कर्णधारपदाविषयी विचारताच असं का म्हणाला सूर्या?

Suryakumar Yadav: दक्षिण आफ्रिकेमध्ये टीम इंडिया ४ टी-२० सामने खेळणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने मोठं विधान केलं आहे.
suryakumar yadav
suryakumar yadavsaam tv
Published On

आजपासून टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० सिरीजला सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताची टीम मैदानात उतरणार आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेमध्ये टीम इंडिया ४ टी-२० सामने खेळणार आहे. न्यूझीलंडविरूद्धची टेस्ट सिरीज हरल्यानंतर या टी-२० सिरीजकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-२० सिरीजला आजपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने मोठं विधान केलं आहे.

suryakumar yadav
Cricket news: 'या' वरिष्ठ खेळाडूकडून निवृत्तीची घोषणा; चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वनडेला ठोकणार रामराम

न्यूझीलंडविरूद्धची टेस्ट सिरीज गमावल्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावरून अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. सू्र्याला देखील याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सू्र्याच्या म्हणण्यानुसार, रोहित भाईकडून मी खूप काही शिकलोय. तो ज्यावेळी खेळतो, त्यावेळी मी काहीतरी शिकत असतो.

रोहितबाबत काय म्हणाला सूर्यकुमार?

कर्णधार सूर्या म्हणाला की, खेळामध्ये विजय आणि पराभव हे होतच असतात. सर्वजण जिंकण्यासाठी मेहनत करतात. यावेळी कधी चांगल्या गोष्टी घडतात तर कधी घडत नाही. मात्र अशातही मी रोहितकडून शिकलोय ते म्हणजे तुमच्या आयुष्यात समतोल कसा राखला पाहिजे आणि ते किती गरजेचं आहे.

suryakumar yadav
Rohit Sharma: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, १८ वर्षांनंतर खेळवणार खास टूर्नामेंट

जर चांगली गोष्ट केल्यानंतर निकाल खराब असेल तर तो कॅरेक्टर बदलत नाही. एक खेळाडू म्हणून ही एक चांगली क्वालिटी असते. बाकी मी काय बोलणार त्याच्या बाबतीत. मी नेहमीच त्याच्याकडून काही शिकत असतो, असंही सूर्यकुमार यादव म्हणालाय.

पहिल्या टी-२० साठी कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग ११

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशक, आवेश खान ,यश दयाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com