Virat Kohli Dance: शाकिब बाद होताच किंग कोहलीचा 'विराट' जल्लोष! भन्नाट डान्सचा Video व्हायरल

Virat Kohli Dance Video: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीत शाकिब अल हसन बाद होताच विराटने भन्नाट डान्स केला आहे. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
Virat Kohli Dance: शाकिब बाद होताच किंग कोहलीचा 'विराट' जल्लोष! भन्नाट डान्सचा Video व्हायरल
virat kohlitwitter
Published On

चेन्नई कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. भारतीय संघाने बांगलादेशसमोर विजयासाठी ५१५ धावांचं भलंमोठं आव्हान ठेवलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला तिसऱ्या दिवसाखेर ४ गडी बाद १५८ धावा करता आल्या.

दरम्यान ६ फलंदाजांना बाद करून भारतीय संघ या मालिकेत १-० ने आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात शाकिब अल हसन बाद झाल्यानंतर विराट कोहली डान्स करताना दिसून येतोय.

बांगलादेशची फलंदाजी सुरू असताना, शाकिब अल हसन फलंदाजी करत होता. तर भारताकडून रविंद्र जडेजा गोलंदाजी करत होता. त्यावेळी जडेजाने टाकलेल्या चेंडूवर शाकिबने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटची कडा घेत यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हातात गेला. सर्वांनी अंपायरकडे जोरदार मागणी केली. मात्र अंपायरने ही मागणी फेटाळून लावली. मात्र रिप्ले घेतला असता त्यात दिसून आलं आहे की, तो बाद आहे.

Virat Kohli Dance: शाकिब बाद होताच किंग कोहलीचा 'विराट' जल्लोष! भन्नाट डान्सचा Video व्हायरल
IND vs BAN,1st Test Day 4: चौथ्या दिवशी पाऊस खेळ बिघडवणार? कसं असेल हवामान? जाणून घ्या

मग काय, भारतीय खेळाडूंचा आनंद अनावर झालं. विराट कोहली तर डान्स करताना दिसून आला. क्रिकेटच्या मैदानावर डान्स करण्याची ही विराटची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा तो डान्स करताना दिसून आला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Virat Kohli Dance: शाकिब बाद होताच किंग कोहलीचा 'विराट' जल्लोष! भन्नाट डान्सचा Video व्हायरल
IND vs BAN 1st Test: विराट कोहलीचा जलवाच भारी! १७ धावा केल्या तरी तोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने ३७६ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला १४९ धावा करता आल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ४ गडी बाद २८७ धावा करत भारताने डाव घोषित केला. हा सामना जिंकण्यासाठी बांगलादेशसमोर ५१५ धावांचं मोठं आव्हान आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com