

MSK Prasad On Virat kohli: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) २०१४ पासून ते २०२२ पर्यंत संघाचं नेतृत्व केलं. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने दमदार कामगिरी केली होती. याच कालावधीत भारतीय संघाने सर्वाधिक कसोटी सामने जिंकले होते.
त्याने जानेवारी २०२२ मध्ये कर्णधारपदावरून माघार घेण्याचा निर्णयl घेतला होता. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर विराटला पुन्हा एकदा कर्णधारपद देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान याबाबत बोलताना माजी निवडकर्त्याने मोठं वक्तव्य केलं आहे. (MSK Prasad)
भारतीय संघाचे माजी निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी विराटला कर्णधारपद देण्याच्या मागणीला समर्थन केलं आहे. त्यांच्या मते विराटला पुन्हा एकदा कर्णधारपद दिलं गेलं पाहिजे. यासाठी त्यांनी अजिंक्य रहाणेचं उदाहरण दिलं आहे.
एमएसके प्रसाद यांनी खेल नावला दिलेल्या मुलाखत दिली होती. यादरम्यान त्यांना विचारण्यात आलं होतं की, रोहितनंतर कोणाला संघाचं कर्णधारपद दिलं गेलं पाहिजे? याबाबत बोलताना ते म्हणाले की, ' विराट का नाही? अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपद दिलं जाऊ शकतं तर विराट का नाही? मला नाही माहित की, विराटचं याबाबत काय मत आहे. मात्र निवडकर्ते जर रोहितला मागे सोडून पुढे जाण्याच्या विचारात असतील तर विराट कोहली एक पर्याय असू शकतो. (Latest sports updates)
विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड..
विराट कोहलीने कर्णधार म्हणून भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. त्याने ६८ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यादरम्यान ४० सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे.
तर १७ कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तो भारतीय संघासाठी सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा कर्णधार आहे. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.