Virat Kohli: मेलबर्न एअरपोर्टवर विराट ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांना भिडला; कोहलीला इतका राग का आला?

Virat Kohli: विराट कोहली पुन्हा एकदा त्याच्य्या अर्ग्रेशनमुळे चर्चेत आला आहे. नुकतंच एअरपोर्टवर एक रिपोर्टर आणि कॅमेरामॅनची विराटसोबत शाब्दिक बाचाबाची झाली आहे.
Virat Kohli refuses
Virat Kohli refusessaam tv
Published On

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. नुकतंच तिसरा टेस्ट सामना संपला असून आता काही काळ टीम इंडियाच्या खेळाडूंना आराम आहे. अशातच एअरपोर्टवर टीम इंडियाचा क्रिकेटर विराट कोहली पुन्हा एकदा त्याच्य्या अर्ग्रेशनमुळे चर्चेत आला आहे. नुकतंच एअरपोर्टवर एक महिला मआणि कॅमेरामॅनची विराटसोबत शाब्दिक बाचाबाची झाली आहे.

विराट कोहली कारकिर्दीच्या सुरुवातीला जितका आक्रमक होता तितका तो आता नाहीये. लग्न करून कुटुंबात रूळल्यानंतर त्याचा राग कमी झाला आहे. पण अनेकदा अशा गोष्टी घडतात ज्यामुळे विराटला रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. बॉक्सिंग डे टेस्टसाठी टीम इंडिया मेलबर्न विमानतळावर पोहोचली तेव्हाही असंच काहीसं घडलं.

ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, टीम इंडिया मेलबर्न विमानतळावर पोहोचली तेव्हा काही रिपोटर्स आणि कॅमेरामन विराट कोहलीच्या फॅमिलीचे फोटो काढत होते. यावेळी वारंवार नकार देऊनही ते ऐकले नाहीत.

Virat Kohli refuses
IND vs AUS: सिराजची ती चूक टीम इंडियाला महागात पडली असती! ड्रॉ सोडा, सामनाच हातून गेला असता

आपल्या मुलांना प्रसिद्धीच्या झोतापासून दूर ठेवायचं असं विराट कोहली आणि अनुष्का शर्माने सुरुवातीपासूनच स्पष्ट केलं होतं. ज्यावेळी विराट भारतात असतो, तेव्हा तो मीडियाला विनंती करतो. यामध्ये भारतीय मीडिया देखील खेळाडूच्या या विनंतीचा आदर करतो. पण ऑस्ट्रेलियन मीडियाच्या बाबतीत असं दिसून आलं नाही.

Virat Kohli refuses
India vs Australia: गाबा टेस्टचा दुसरा दिवस हेड-स्मिथने गाजवला; ऑस्ट्रेलियाचं पारडं जड तर टीम इंडिया बॅकफूटवर

ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, रिपोर्टर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडशी बोलत होता. त्यावेळी कोहली आणि त्याचं कुटुंब त्याठिकाणी होतं. कोहलीचे फोटो घेण्यासाठी कॅमेरे लगेच त्याच्याकडे वळले. यावेळी कोहलीने कॅमेरा येण्यापूर्वीत आक्षेप घेतला. कोहलीने चॅनल नाइनच्या रिपोर्टरला मीडियाच्या इतर सदस्यांसमोर जोरदार फटकार लगावली. या संभाषणानंतर कोहली तेथून निघून गेला.

Virat Kohli refuses
IND vs AUS: गाबा टेस्टमध्ये रोहित शर्माला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडूला दुखापत, मैदानही सोडावं लागलं

गाबा टेस्ट झाली ड्रॉ

बॉर्डर गावस्करची ही 5 सामन्यांची टेस्ट सिरीज 3 सामन्यांनंतर 1-1 अशी बरोबरीत आहे. भारताने पर्थ कसोटी २९५ रन्सने जिंकून चांगली सुरुवात केली होती. तर ऑस्ट्रेलियाने ॲडलेडमधील पिंक बॉल जिंकून दमदार पुनरागमन केलं. तिसरी टेस्टमध्ये पावसाने खेळ केला आणि सामना ड्रॉ झाला.

Virat Kohli refuses
R Ashwin Net Worth: किती संपत्तीचा मालक आहे अश्विन? क्रिकेटशिवाय 'या' ठिकाणांहून होते कमाई

26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये चौथा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून सिरीजमध्ये आघाडी घेऊन पराभव टाळण्याकडे दोन्ही टीमचं लक्ष असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com