Venkatesh Iyer Century: KKR चा १५ वर्षांचा वनवास संपला! मुंबईला धू धू धुवत !वेंकटेशने झळकावलं कारकिर्दीतलं पहिलं शतक

Venkatesh Iyer: वेंकटेश अय्यरने तूफान फटकेबाजी करत जोरदार शतक झळकावले आहे.
venkatesh iyer
venkatesh iyertwitter
Published On: 

MI VS KKR IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील २२ वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र कोलकाता नाईट रायडर्सने हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला आहे. कारण कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून वेंकटेश अय्यरने तूफान फटकेबाजी करत जोरदार शतक झळकावले आहे.

venkatesh iyer
Virat Kohli IPL 2023: हाय व्होल्टेज सामन्यात विराट अन् गांगुलीने वाढवला पारा! सामन्यानंतर नेमकं काय घडलं? - VIDEO

आयपीएल कारकीर्दीतील पहिलेच शतक..

एकीडके विकेट्स जात असताना वेंकटेश अय्यर एक बाजू धरून होता. त्याने मुंबईच्या फिरकी आणि वेगवान गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने या डावात ४९ चेडूंचा सामना करत आपले शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ९ षटकार मारले. हे त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील पहिलेच शतक आहे.

पावरप्लेच्या षटकात वेंकटेश शो..

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघातील सलामीवीर फलंदाज रहमानउल्ला गुरबाज स्वस्तात माघारी परतला. त्याला या सामन्यात अवघ्या ८ धावा करता आल्या. तर नारायण जगदीशन शून्यावर माघारी परतला.

कर्णधार नितीश राणा कडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो देखील अवघ्या ५ धावा करत माघारी परतला. या परिस्थितीत वेंकटेश अय्यरने टिचुन फलंदाजी करत संघाचा डाव सांभाळला.

venkatesh iyer
IPL 2023 Shikhar Dhawan: शिखर धवन ऐवजी सॅम करन टॉससाठी का आला? यामागचं प्रमुख कारण आलं समोर

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

मुंबई इंडियन्स:

इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार ), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, पियुष चावला, दुआन जॅनसेन, रिले मेरेडिथ

कोलकाता नाईट रायडर्स:

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com