

ACC मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ मध्ये भारत 'अ' (India A) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यात सामना झाला. दोहा येथील 'युनिव्हर्सिटी ऑफ दोहा फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी' क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बेबी बॉस वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातला.
'बेबी बॉस' वैभव सूर्यवंशीने इंडिया 'ए' (India A) साठी अवघ्या 52 चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण केलं. हे 'लिस्ट ए' (List A) क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद द्विशतक ठरलंय. वैभवने एकूण 53 चेंडूंमध्ये २०४ धावा केल्या, ज्यामध्ये 28 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. व्यावसायिक क्रिकेट सामन्यात एका फलंदाजाने मारलेल्या षटकारांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.
52 वैभव सूर्यवंशी, भारत अ वि यूएई, 2026
103 चाड बोवेस, कँटरबरी वि ओटागो, क्राइस्टचर्च, 2024
114 एन जगदीसन, तामिळनाडू वि अरुणाचल, बेंगळुरू, 2022
114 हॅरी ब्रूक, इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, रावळपिंडी, 2026
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.