Suryakumar Yadav: दुसऱ्या टी-२० मध्ये ७ गोलंदाजांचा वापर तरीही हार्दिकला गोलंदाजी का नाही? अखेर सूर्यकुमारने स्पष्ट केलं कारण

Suryakumar Yadav: टीम इंडियाने ३ सामन्यांच्या सिरीजमध्ये २-० अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने हार्दिक पंड्याला का गोलंदाजी दिली नाही, याचं कारण स्पष्ट केलं आहे.
Hardik pandya doesnt bowl
Hardik pandya doesnt bowlsaam tv
Published On

दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावर बुधवारी भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये दुसरा टी-२० सामना रंगला होता. या सामन्यात भारताने ८६ रन्सने बांगलादेशाचा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने ३ सामन्यांच्या सिरीजमध्ये २-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाकडून ७ खेळाडूंनी गोलंदाजी केली. मात्र यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने हार्दिक पंड्याला का गोलंदाजी दिली नाही, याचं कारण स्पष्ट केलं आहे.

दुसरा टी-२० सामना आणि सिरीज जिंकल्यानंतर टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादव फार खुशीत दिसत होता. या सामन्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये सूर्यकुमारने हार्दिकला का गोलंदाजी दिली नाही, याबाबत खुलासा केला आहे.

Hardik pandya doesnt bowl
Hardik Pandya : ICC रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा; हार्दिक पंड्याची मोठी झेप, थेट क्रमांक १ जवळ पोहोचला

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

बांगलादेशाचा पराभव केल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, मला अशी स्थिती हवी होती की, लवकर विकेट्स जाऊन आमच्या ५-६-७ व्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंना फलंदाजीची संधी मिळेल. रिंकु आणि नीतिशच्या खेळामुळे मी फार खूश आहे. मला जशी अपेक्षा होती त्या दोन्ही खेळाडूंनी त्याचप्रमाणे फलंदाजी केली. मुळात अशावेळी तुम्हाला मैदानात जाऊन तुमची क्षमता दाखवायची असते. माझा फक्त एकच संदेश होता की, तुम्ही तुमच्या राज्यासाठी आणि फ्रेंचायझीसाठी काय करते तेच इथेही जा आणि करून दाखवा.

गोलंदाजीबाबत बोलताना सूर्या म्हणाला, मला पहायाचं होतं की, विविध गोलंदाज वेगवेगळ्या परिस्थितीत कशी गोलंदाजी करतात. ते कठीण परिस्थितीत गोलंदाजी करू शकतात का, हे देखील मला पाहायचं होतं. अशावेळी कधी हार्दिक गोलंदाजी करणार नाही किंवा कधी वॉशिंगटन सुंदर गोलंदाजी करणार नाही. इतर गोलंदाजांमध्ये काय कौशल्य आहे हे पहायचं होतं.

Hardik pandya doesnt bowl
IND vs BAN, 2nd T2OI: टीम इंडियाच्या विजयाची सप्तमी! बांगलादेशला नमवत मालिकेत घेतली २-० ची विजयी आघाडी

टीम इंडियाने जिंकली टी-२० सिरीज

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T20 सिरीजमधील दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताने 9 विकेट्स गमावत 222 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशाला २० ओव्हर्समध्ये केवळ १३५ रन्स करता आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com