Hardik Pandya : ICC रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा; हार्दिक पंड्याची मोठी झेप, थेट क्रमांक १ जवळ पोहोचला

Hardik Pandya ranking : ICC रॅकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. या रॅकिंगमध्ये हार्दिक पंड्याने मोठी झेप घेतली आहे.
Hardik Pandya
Hardik Pandya SaamTv
Published On

Hardik Pandya ICC T20 rankings : भारत आणि बांगलादेशदरम्यान टी२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकादरम्यान, आयसीसीने नवी रँकिंग यादी जारी केली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याने अष्टपैलूंच्या यादीत मोठी झेप घेतली. बांगलादेशच्या विरोधात दोन सामने बाकी आहेत. या दोन्ही सामन्यात चांगला खेळ दाखवला तर तो जगातील सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू ठरू शकतो. या यादीत हार्दिक खेळाडूच्या आधी फक्त दोनच खेळाडू आहेत.

आयसीसीकडून टी२० मधील अष्टपैलू खेळाडूंची यादी जारी केली. या यादीत इंग्लंडचा खेळाडू लियाम लिविंगस्टन पहिल्या क्रमाकांवर आहे. त्याची रेटिंग २५३ आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर नेपाळचा दीपेंद्र सिंह ऐरी आहे. त्याची रेटिंग २३५ आहे. तर भारताच्या हार्दिक पंड्याने चार स्थानाने झेप घेत थेट तिसऱ्या क्रमाकांवर पोहोचला आहे. त्याची रेटिंग सध्या २१६ इतकी आहे. तो याआधी पहिल्या स्थानावर देखील पोहोचला होता. काही महिन्यानंतर त्याची घसरण सुरु होती. पण आता त्याने पुन्हा एकदा झेप घेण्यास सुरुवात केली आहे.

Hardik Pandya
IND W vs SL W: टीम इंडियासाठी गुड न्यूज! महत्वाच्या सामन्यात स्टार खेळाडू खेळणार; उप-कर्णधाराने दिली मोठी अपडेट

हार्दिक पंड्या रँकिंगमध्ये पुढे गेल्याने अनेक खेळाडूंचं नुकसान झालं आहे. मार्कस स्टॉयनिस आता २११ च्या रेटिंगसोबत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. झिम्बाव्बेच्या सिकंदर रजाचंही नुकसान झालं आहे. त्याची रँकिंग २०९ रेटिंग असून तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी देखील एक स्थान खाली पोहोचला. मोहम्मद नबी हा २०२५ च्या रेटिंगने ७ व्या क्रमांकावर पोहोचला. या व्यतिरिक्त टॉप रँकिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Hardik Pandya
Joe Root: जो रुट बनला इंग्लंडचा 'ऑल टाईम ग्रेट' बॅट्समन! दिग्गज फलंदाजांना सोडलं मागे

ग्वालियरमध्ये हार्दिक पंड्याने दाखवली कमाल

बांगलादेशविरोधात ग्वालियरमध्ये झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्याने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये कमाल दाखवली आहे. त्याने गोलंदाजीत चार षटकात २६ धावा दिल्या. तर एक गडी बाद केला. तर फलंदाजी करताना त्याने १६ चेंडूत ३९ धावा कुटल्या आहेत. त्याने फलंदाजी करताना पाच चौकार आणि दोन षटकार लगावत नाबाद राहिला. या चांगल्या खेळीचा हार्दिक पंड्याला फायदा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com