Hardik Pandya: हार्दिक पंड्या बनला टीम इंडियाचा नवा फिनिशर! धोनी अन् विराटलाही सोडलं मागे

Hardik Pandya News In Marathi: भारताचा स्टार फलंदाज हार्दिक पंड्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये एमएस धोनी आणि विराट कोहलीला मागे सोडलं आहे.
Hardik Pandya: हार्दिक पंड्या बनला टीम इंडियाचा नवा फिनिशर! धोनी अन् विराटलाही सोडलं मागे
hardik pandyatwitter
Published On

IND vs BAN, Hardik Pandya Record: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये नेहमीच स्वत:ला सिद्ध केलंय. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा तेव्हा त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली आहे.

आयपीएल स्पर्धेत त्याने अनेकदा शेवटपर्यंत सामना घेऊन जाऊन संघाला विजय मिळवून दिला आहे. यासह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याने शेवटी फलंदाजीला येऊन षटकार मारुन संघाला विजय मिळवून दिला आहे. दरम्यान हार्दिक पंड्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना ग्वालियरमध्ये पार पडला. या सामन्यात हार्दिक पंड्याने षटकार मारुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

या डावात हार्दिकच्या स्टायलिश फलंदाजीची झलक पाहायला मिळाली. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांच्या चांगलाच समाचार घेत एकापेक्षा एक हटके शॉट मारले. यादरम्यान त्याने मारलेला नो लूक शॉट चर्चेत राहिला. त्याने शॉट मारल्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही.

Hardik Pandya: हार्दिक पंड्या बनला टीम इंडियाचा नवा फिनिशर! धोनी अन् विराटलाही सोडलं मागे
IND vs BAN: अर्शदीप सिंगच्या नावे नव्या रेकॉर्डची नोंद; अश्विन, बुमराह आणि नेहरालाही सोडलं मागे

हार्दिकच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

षटकार मारुन सामना जिंकून देणाऱ्या फलंदाजांचा जेव्हा जेव्हा उल्लेख केला जातो, तेव्हा एमएस धोनीचं नाव आवर्जून घेतलं जातं. मात्र विराट कोहलीने त्यालाही मागे सोडलंय. विराटने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना, ४ वेळेस षटकार मारुन सामना जिंकून दिला आहे. तर एमएस धोनीने हा कारनामा ३ वेळेस केला होता. आता हार्दिक पंड्याने ५ वेळेस हा कारनामा करत विराट आणि धोनी दोघांनाही मागे सोडलं आहे.

Hardik Pandya: हार्दिक पंड्या बनला टीम इंडियाचा नवा फिनिशर! धोनी अन् विराटलाही सोडलं मागे
IND vs BAN: बांगलादेशला धूळ चारताच टीम इंडियाने रचला इतिहास! १७ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

हार्दिक, विराट आणि धोनीनंतर भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत या यादीत चौथ्या स्थानी आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२८ धावा करायच्या होत्या. या मैदानावर १२८ धावांचा पाठलाग करणं मोठं काम नव्हतं.

कारण, चेंडू बॅटवर वेगाने येत होता. सलामीला आलेल्या संजू सॅमसनने २९ धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवनेही २९ धावा केल्या. शेवटी हार्दिक पंड्याने चौफेर फटकेबाजी करत ३९ धावांची खेळी केली आणि भारतीय संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com