Vaibhav Suryavanshi: IPLचा यंगेस्ट करोडपती, पहिल्याच पेपरमध्ये नापास; PAK विरुद्ध अवघ्या इतक्या धावांवर झाला बाद

IND U19 vs PAK U19: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे.
Vaibhav Suryavanshi: लिलावात कोटींची बोली, १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप शो
vaibhav suryavanshitwitter
Published On

Under 19 Asia Cup 2024, Vaibhav Suryavanshi: अंडर १९ आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील तिसरी लढत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून वैभव सूर्यवंशीला संधी दिली गेली होती.

लिलावात कोट्यवधींची बोली लागलेला वैभव पाकिस्तानविरुद्ध खेळताना कशी कामगिरी करणार यावर सर्वांचं लक्ष लागून होतं. मात्र पहिल्याच सामन्यात त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे.

दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरु असलेल्या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २८२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे ही जोडी मैदानावर आली.

मात्र या जोडीला हवी तशी सुरुवात करुन देता आली नाही. भारताला २८ धावांवर पहिला धक्का बसला. आयुष म्हात्रे २० धावांची खेळी करत माघारी परतला. त्यानंतर पाचव्या षटकात वैभवनेही पॅव्हेलियनची वाट धरली.

Vaibhav Suryavanshi: लिलावात कोटींची बोली, १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप शो
Ind vs Aus 2nd Test: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाज दुसऱ्या कसोटीतून होऊ शकतो बाहेर

वैभव सुरुवातीपासूच फलंदाजीत संघर्ष करताना दिसून येत होता. त्याच्यावर दबाव असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. या डावात त्याला ९ चेंडू खेळून केवळ १ धाव करता आली. काही दिवसांपूर्वीच झालेल्या आयपीएल लिलावात त्याच्यावर कोटींची बोली लागली होत. या लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला १.१० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं. मात्र त्याला अपेक्षेप्रमाणे खेळी करता आलेली नाही.

Vaibhav Suryavanshi: लिलावात कोटींची बोली, १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप शो
IND vs AUS: दुसऱ्या सामन्यापूर्वी टेन्शन वाढलं! स्टार अष्टपैलू होऊ शकतो संघाबाहेर

सामन्यापूर्वी झालेल्या मुलाखतीत त्याने म्हटले होते की, देशासाठी आशिया कपची ट्रॉफी जिंकून द्यायची आहे. यादरम्यान तो कुठलाही प्रेशर घेणार नाहीये. मात्र या सामन्यात फलंदाजी करताना तो प्रेशरमध्ये असल्याचं दिसून आलं. वैभव हा केवळ १३ वर्षांचा आहे. मात्र आयपीएलमध्ये निवड झाल्यापासून त्याच्य वयावरुन त्याला ट्रोल केलं जात आहे. त्याचं वय हे १३ पेक्षा जास्त आहे. त्याने वयात काहीतरी फेरफार केली आहे. असे आरोप नेटकऱ्यांकडून केले जात आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com