

Asia Cup 2023 : आशिया कप 2023 साठीच्या बहुप्रतिक्षित टीम इंडियाची घोषणा आज बीसीसीआयने केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ स्पर्धा खेळणार आहे. तर संघाचे उपकर्णधारपद हार्दिक पंड्याकडे असणार आहे. बुमराह दुखापतीनंतर मोठ्या स्पर्धेत दिसणार आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर देखील संघात कम बॅक करत आहेत. आयपीएल गाजवणारा मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज तिलक वर्माची संघात सरप्राईज एन्ट्री झाली आहे.
येत्या 30 ऑगस्टपासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघाने पाकिस्ताानात जाऊन खेळण्यास नकार दिल्याने ही स्पर्धेतील 9 सामने श्रीलंकेत तर 4 सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहे.
भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूची समस्या कायम आहे. श्रेयस अय्यरने काही प्रमाणात चांगली कामगिरी केली, त्या जागेवर अजूनही त्याने आपलं स्थान भक्कम केलेलं नाही .श्रेयस अय्यर आणि केएल राहुलही दुखापतीतून परतले आहेत. दोन्ही खेळाडू चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतात. मात्र या दोघांपैकी एखादा खेळू शकला नाही, तर तिसरा पर्याय म्हणून तिलक वर्मा असू शकतो. (Latest sports updates)
टीम इंडियात तिलक वर्माचा समावेश करण्यामागे चौथ्या क्रमांकाची फलंदाजीचा पर्याय असू शकतो. आशिया कपनंतर विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. त्यामुळे आशिया चषकमध्ये टीम इंडियाच्या उणिवा कळतील. यानंतर तिलक वर्माला वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग बनवलं जाऊ शकतं.
टिळक वर्मा डावखुरा फलंदाज आहे, ही देखील त्याची उजवी बाजू आहे. त्यामुळे मधल्या फळीत उजवा-डावा खेळाडू या कॉम्बिनेशनचा संघाला फायदा होऊ शकतो. काही तज्ज्ञांनीही तिलकला चौथ्या क्रमांकासाठी वनडे संघात घ्यावं, अशी मागणी केली होती.
तिलक वर्माने टीम इंडियासाठी आतापर्यंत 7 टी-20 सामने खेळले आहेत. आता अचानक त्याचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याने टी-20 पदार्पण करून प्रभावित केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 7 T20 सामन्यात त्याने 174 धावा केल्या होत्या. एकदिवसीय विश्वचषक फक्त भारतातच होणार आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा तिलक वर्माला चांगला अनुभव आहे. अशाप्रकारे आशिया चषक संघातून तो विश्वचषक स्पर्धेपर्यंतचा प्रवास करू शकतो, असे म्हणता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.