
Ind Vs Eng कसोटी मालिका सध्या लीड्समधील हेडिंग्ले स्टेडियमवर सुरु आहे. कसोटी मालिकेदरम्यान काही भारतीय खेळाडू काउंटी क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. नुकतंच इशान किशनने काउंडी क्रिकेटमध्ये पदार्पण अर्धशतक झळकावले होते. आता तिलक वर्माने काउंटी कारकिर्दीच्या पहिल्या सामन्यात खणखणीत शतक ठोकले आहे.
काउंटी चॅम्पियनशिपच्या डिव्हिजन १ सामन्यामध्ये तिलक वर्माने हॅम्पशायरकडून खेळताना एसेक्सविरुद्ध शतक झळकावले आहे. या सामन्यामध्ये हॅम्पशायरच्या संघाने फक्त ३४ धावांवर २ विकेट्स गमावल्या असताना तिलक वर्मा फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने संयमी खेळी करत शतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यत तिलक ९८ धावा करुन नाबाद परतला. तिसऱ्या दिवशी पहिल्या ओव्हरमध्ये त्याने शतक पूर्ण केले.
तिलक वर्माचा डाव १०० धावांवर संपला. त्याने ११ चौकार आणि ३ षटकार मारत शतकीय खेळी केली. हॅम्पशायरच्या लियान डॉसनसोबत तिलकने १३३ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. या सामन्यामध्ये डॉसनने देखील शतक झळकावले आहे. एका बाजूला भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्याचा थरार सुरु असताना इंग्लंडच्या मैदानावर तिलक वर्मा चमकला आहे.
काउंटी क्रिकेटच्या पहिल्याच सामन्यामध्ये शतक झळकावल्यानंतर तिलक वर्माने माध्यमांशी संवाद झाला. 'कसोटी क्रिकेट हा क्रिकेटमधील माझा आवडता फॉरमॅट आहे. मी या संधीची कधीपासून वाट पाहत होतो. मी टी-२० मध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. मी टी-२० फॉरमॅटचा फलंदाज आहे, असे अनेकांना वाटते. पण मला कसोटी क्रिकेटही तितकेच आवडते;, असे तिलक वर्मा म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.