Tickets For World Cup 2023: वर्ल्डकप २०२३ सामन्यांची तिकीटे कधी आणि कशी बुक करायची? जाणून घ्या एकाच Click वर

World Cup Ticket Rates: वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या तिकीटांच्या विक्रीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
team india
team indiasaam tv

ICC World Cup Online Ticket:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा प्रारंभ ५ ऑक्टोबरपासून होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

बुधवारी(९ ऑगस्ट) आयसीसीने या स्पर्धेच्या सुधारीत वेळापत्रकाची घोषणा केली आहे. यासह स्पर्धेसाठीच्या तिकीटांच्या विक्रीबाबत देखील मोठी अपडेट समोर आली आहे.

team india
ODI World Cup 2023: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश; दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी

वर्ल्डकपच्या ऑनलाइन तिकीटांची विक्री केव्हापासून?

आगामी वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामन्यांच्या तिकीट विक्रीला २५ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. तर सेमी फायनल आणि फायनलच्या सामन्यांचे ऑनलाइन तिकीट १५ सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे.

या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. हे सामने भारतातील १० वेगवेगळ्या शहरात रंगणार आहेत.

याबाबत बोलताना बीसीसीआयचे सचिव जस शाह यांनी म्हटले होते की, 'आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी ई -तिकीट उपलब्ध नसतील. मात्र आम्ही फिजिकल तिकिट्स उपलब्ध करून देऊ. फिजिकल तिकिट्स सामन्याच्या ७ ते ८ दिवसांपूर्वी उपलब्ध करून दिली जातील. मोठ्या ठिकाणी ई -तिकीट उपलब्ध करून देणं कठीण जातं.' (Latest sports updates)

team india
Team India News: एशिया कप २१ तर वर्ल्डकप ५७ दिवसांवर, टीम इंडियाला केव्हा मिळणार परफेक्ट प्लेइंग ११; काय आहेत आव्हानं? वाचा सविस्तर

कसं मिळवायचं तिकीट?

आगामी वर्ल्डकप स्पर्धेचं तिकीट तुम्हाला ऑनलाइन देखील मिळवता येणार आहे. तुम्ही हे तिकीट Paytm Insider, Book My Show App किंवा आयसीसीच्या अधिकृत साईटवरून देखील बुक करू शकता. मात्र तुम्हाला ई तिकीट घेऊन मैदानात प्रवेश मिळणार नाही. फिजिकल तिकीट मिळवण्यासाठी तुम्हाला स्टेडियममध्ये किंवा ठराविक ठिकाणी जाऊन घ्यावं लागणार आहे.

भारत- पाकिस्तान सामन्याच्या तारखेत बदल..

भारत आणि पाकिस्तान हा सामना ठरलेल्या वेळापत्रकानुसार १५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार होता. मात्र आता या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. हा सामना १४ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com