
प्लेइंग ११ मध्ये योग्य खेळाडूची निवड कशी करायची हे भारतीय संघाला चांगलच माहीत आहे. भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी १५ खेळाडूंची निवड केली होती. यादरम्यान रोहित शर्माने केवळ १२ खेळाडूंचा वापर केला. यादरम्यान ३ खेळाडू असे होते, ज्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मुख्य बाब म्हणजे, एकही सामना न खेळून या खेळाडूंनी कोट्यावधींची कमाई केली.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघात १५ खेळाडूंना स्थान देण्यात आलं होतं. भारतीय संघाकडून सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये हर्षित राणाला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती.
त्यानंतर पुढील सामन्यांमध्ये प्लेइंग ११ मध्ये एकमात्र बदल करण्यात आला तो म्हणजे, हर्षित राणाला प्लेइंग ११ मधून बाहेर करून, त्याच्या जागी वरुण चक्रवर्तीला संधी देण्यात आली. हा बदल सोडला तर उर्वरित १० खेळाडू जैसे थे राहिले. त्यामुळे संघात स्थान मिळालेल्या अर्शदीप सिंग, रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
मात्र संघाबाहेर बसण्याचा या खेळाडूंच्या कमाईवर कुठलाही परिणाम झालेला नाही. प्लेइंग ११ मधून बाहेर बसलेल्या खेळाडूंनाही बीसीसीआयकडून मॅच फी दिली जाते. आता भारतीय संघ चॅम्पियन बनला आहे. त्यामुळे खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला जाईल. या खेळाडूंनाही तितकीच रक्कम मिळेल जितकी इतर खेळाडूंना मिळेल.
भारत आणि न्युझीलंड यांच्यातील फायनल सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना या संघाने २५१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४ गडी राखून विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.