Champions Trophy: गावसकरांचा लहान मुलांसारखा डान्स; गंभीर – पंड्याचा भांगडा; सेलिब्रेशनचा VIDEO एकदा पाहाच

Team India Victory Celebration: भारतीय संघाने न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. या विजयानंतर भारतीय खेळाडू जोरदार जल्लोष करताना दिसून आले.
Champions Trophy: गावसकरांचा लहान मुलांसारखा डान्स; गंभीर – पंड्याचा भांगडा; सेलिब्रेशनचा VIDEO एकदा पाहाच
sunil gavaskartwitter
Published On

भारतीय खेळाडूंनी अखेर करून दाखवलं. ज्या ट्रॉफीची गेल्या १२ वर्षांपासून वाट पाहिली जात होती, अखेर भारताने ती ट्रॉफी जिंकून दाखवली. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली.

या विजयानंतर केवळ भारतीय खेळाडूच नव्हे तर कोट्यावधी भारतीयांनी जल्लोष केला. यादरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि नवज्योत सिंग सिद्धू देखील मैदानावरच डान्स करताना दिसून आले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Champions Trophy: गावसकरांचा लहान मुलांसारखा डान्स; गंभीर – पंड्याचा भांगडा; सेलिब्रेशनचा VIDEO एकदा पाहाच
IND vs NZ: टीम इंडिया तर मालामाल पण न्यूझीलंडवरही पैशांचा पाऊस; पाहा दोन्ही संघांना किती मिळाली प्राईज मनी

७५ वर्षांचे गावसकर लहान मुलांसारखे नाचू लागले..

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकणं हे भारतीय संघासाठी ऐतिहासिक होतं. भारतीय खेळाडूंनी जेव्हा ही ट्रॉफी उंचावली तेव्हा सुनील गावसकरांना राहावलं नाही. ट्रॉफी उंचावताना पाहून ते लहान मुलांसारखा मनसोक्त डान्स करताना दिसून आले. गावसकरांसह रॉबिन उथप्पा देखील दिसून आला. सुनील गावसकरांनी केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Champions Trophy: गावसकरांचा लहान मुलांसारखा डान्स; गंभीर – पंड्याचा भांगडा; सेलिब्रेशनचा VIDEO एकदा पाहाच
Ind vs Nz Live : धोनीचा बदला विराटने घेतला, सँटनर आऊट होताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण

गंभीर अन् नवज्योत सिंग सिद्धू यांचा भांगडा

नव्यजोत सिंग सिद्धू समालोचन करत असताना आपल्या कवितांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र यावेळी त्यांना आपल्या डान्सचं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली. विजयाचं सेलिब्रेशन करताना त्यांनी हार्दिक पंड्यासोबत मैदानावरच डान्स केला. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील भांगडा करताना दिसून आला. या दिग्गज खेळाडूंच्या डान्स स्टेप्सचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

भारतीय संघाचा शानदार विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडला ५० षटकअखेर २५१ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४ गडी राखून विजयाची नोंद केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com