IPL 2025 स्पर्धेत इतक्या खेळाडूंना रिटेन करता येणार; लवकरच होऊ शकते अधिकृत घोषणा

IPL 2025 Player Retention And RTM Card Rule: आयपीएल २०२५ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने बैठकीचे आयोजन केले
IPL 2025 स्पर्धेत इतक्या खेळाडूंना रिटेन करता येणार; लवकरच होऊ शकते अधिकृत घोषणा
mumbai indianstwitter
Published On

IPL 2025 Player Retention And RTM Card Rule: आयपीएल २०२५ स्पर्धेच्या लिलावाला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात या लिलावाचे आयोजन केले जाऊ शकते. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत, किती खेळाडूंना रिटेन करता येणार? आणि आरटीएम कार्डच्या नियमाबाबत चर्चा करण्यात आली.

खेळाडूंचं रिटेंशन हा आयपीएल फ्रेंचायझींसाठी टेन्शन वाढवणारा विषय ठरतोय. कारण, यापूर्वी फ्रेंचायझींना केवळ ४ खेळाडूंना रिटेन करण्याची अनुमती दिली गेली होती. मात्र यावेळी फ्रेचांयझींनी रिटेन खेळाडूंची मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. दरम्यान पीटीआयच्या वृत्तानुसार, आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने याबाबत मोठा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.

IPL 2025 स्पर्धेत इतक्या खेळाडूंना रिटेन करता येणार; लवकरच होऊ शकते अधिकृत घोषणा
IND vs BAN: टीम इंडियाचे खेळाडू हॉटेलमध्ये परतले.. दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द होणार? वाचा लेटेस्ट अपडेट

पीटीआयच्या वृत्तानुसार, आगामी आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी होणाऱ्या लिलावात प्रत्येक फ्रेंचायझीला ५ खेळाडूंना रिटेन करता येणार आहे. यासह एक RTM कार्डचा नियम असणार आहे. त्यामुळे काही फ्रेचांजझींचं टेन्शन नक्कीच कमी होणार आहे. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत आणखी कोणते निर्णय घेण्यात आले आहेत, हे लवकरच कळेल.

IPL 2025 स्पर्धेत इतक्या खेळाडूंना रिटेन करता येणार; लवकरच होऊ शकते अधिकृत घोषणा
IND vs BAN 2nd Test: दुसऱ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द होणार? वाचा कसं असेल हवामान?

काही फ्रेंचायझींनी RTM कार्डच्या नियमाचा विरोध केला होता. मात्र आता बीसीसीआयने हा नियम लागू केला असल्याचं म्हटलं जातं आहे. यासह बीसीसीआयने फ्रेंचायझींनी केलेली मागणीही मान्य केले आहेत. हा नियम लागू झाल्यास फ्रेंचायझींना आपले ५ प्रमुख खेळाडू संघात कायम राखून ठेवता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com