

वर्ल्डकप स्पर्धेतील महामुकाबला सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
हा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून भारतीय संघाकडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला सलग आठव्यांदा पराभूत करण्याची संधी असणार आहे.
तर पाकिस्तानचा संघ भारतीय संघाचा विजयी रथ रोखण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान भारतीय संघात असा एक फलंदाज आहे, जो पाकिस्तानसाठी अहमदाबादमध्ये कर्दनकाळ ठरू शकतो.
शुभमन गिलने २०२३ मध्ये फलंदाजी करताना १२३० धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ शतके झळकावली आहेत. शुभमन गिलला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने १२६ धावांची तुफानी खेळी केली होती.
आयपीएल स्पर्धेत पाडला धावांचा पाऊस..
शुभमन गिल आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे त्याला या मैदानावर खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. त्याने आयपीएल २०२३ स्पर्धेतील ७ सामन्यांमध्ये ६७.३३ च्या सरासरीने ४०४ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने २ शतके आणि ९४ धावांची नाबाद खेळी केली होती. (Latest sports updates)
अहमदाबादमध्ये राहिलाय खतरनाक रेकॉर्ड..
हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आहे. शुभमन गिल हा पाकिस्तान संघासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. कारण शुभमन गिल हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. अहमदाबादमध्ये खेळताना त्याची ताकद आणखी दुप्पट होते.
कसोटीत ठोकलंय शतक..
केवळ टी-२० क्रिकेटमध्ये नव्हे तर कसोटी क्रिकेटमध्येही त्याने या मैदानावर खेळताना दमदार कामगिरी केली आहे. त्याने यावर्षी ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना १२८ धावांची खेळी केली होती.
गिल पाकिस्तानविरूद्ध खेळणार..
शुभमन गिलला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात खेळताना दिसून आला नव्हता. मात्र पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी तो पूर्णपणे फिट झाला असून तो पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात खेळताना दिसून येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.