१४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम आमने-सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने शुबमन गिलच्या फिटनेसबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. (Latest Marathi News)
भारताचा शुबमन गिलला डेंग्यू झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, शुबमनने डेंग्यू आजारावर मात केली आहे. आजारातून बरा झाल्यानंतर शुबमन संघातील खेळाडूंसोबत सराव केला. डेंग्यू झाल्यामुळे शुबमनला दोन सामने खेळता आले नाही.
आता भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात शुबमन खेळताना दिसणार का, यावरून क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याचदरम्यान, रोहित शर्माने त्याच्या फिटनेसवर मोठं भाष्य केलंय.
रोहित शर्मा म्हणाला, 'रोहित शर्मा सामना खेळण्यासाठी ९९ टक्के तयार आहे. पण त्याला संघात स्थान देण्याचा अंतिम निर्णय नाणेफेकीच्या आधी घेण्यात येईल'.
'घरातील क्रिकेट चाहत्यांच्या समोर खेळताना कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही. घरातील क्रिकेट चाहते कोणत्याही परिस्थितीची परवा न करता आपल्या मागे उभे असतात. आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळतो. मी याकडे एक फायदा म्हणून पाहतो',असं रोहित म्हणाला.
तत्पूर्वी, टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिलने २० वनडे सामन्यात १२३० धावा केल्या आहेत. गिलची सरासरी ७२.३५ इतकी आहे. तर स्ट्राईक रेट हा १०५ पेक्षा अधिक आहे. त्याने या वर्षभरात आतापर्यंत पाच शतके ठोकली आहेत. तर ५ अर्धशतके ठोकली आहेत. त्याने २०८ धावांची द्विशतकी खेळी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.